उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी तयार करा घरच्या घरी ‘हे’ फेसपॅक ! 

शितल मुंडे, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Apr 15, 2021 | 10:05 AM

उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग वाढते. यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी तयार करा घरच्या घरी 'हे' फेसपॅक ! 
सुंदर त्वचा
Follow us

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग वाढते यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यास लिंबू खूप उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी विविध प्रकारचे घरचे घरी फेसपॅक बनवण्याच्या पद्धती घेऊन आलो आहोत. हे फेसपॅक बनविणे खूप सोपे आहे.  (Homemade face packs for radiant skin in summer)

दूध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधात असणाऱ्या लॅक्टीक अॅसिडचा त्वचेसाठी चांगला फायदा होतो. सर्वात अगोदर दोन चमचे दुध घ्या आणि एक चमचा साखर घ्या आणि हे मिश्रण एकत्र करा आणि चेहऱ्याला लावा चेहऱ्याला 25 मिनिटे लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हे केल्याने आपला चेहरा मऊ आणि तजेलदार होईल.

तुम्ही अर्धा टोमॅटो घ्या आणि मॅश करून पेस्ट बनवा. आता त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. पॅक म्हणून तयार पेस्ट चेहरा आणि मान वर लावा. पेस्ट 20 ते 25 मिनिटे तशीच असू द्या. नंतर ताज्या पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यात हा पॅक खूप प्रभावी आहे. याचा नियमित वापर केल्यास आपल्या त्वचेवरील मुरुम आणि सीबमची समस्या दूर होईल.

त्वचेचे तेज वाढविण्यासाठी कोरफडचा रस लिंबाच्या रसमध्ये मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. आता 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या हातांनी मालिश करा. रात्री झोपताना याचा वापर करा आणि रात्रभर तसेच ठेवा. आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढत जाईल. कोरड्या त्वचेसाठी काकडी ही अत्यंत फायदेशीर आहे.

एक हिरव्या रंगाची काकडी घ्या काकडीचे साल काढा आणि काकडी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये मध, दुध आणि गुलाब पाणी मिक्स करा. तयार झालेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावा साधारण 20 मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे उन्हाळ्यात देखील तजेलदार त्वचा राहते.

बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. बेसन पीठात गुलाब पाणी घालावे आणि ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा कोमल होईल. बेसन पीठाचा स्क्रब म्हणून देखील आपण उपयोग करू शकतो.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

(Homemade face packs for radiant skin in summer)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI