व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी मध आणि आले ठरतील रामबाण उपाय!

| Updated on: Apr 14, 2021 | 10:37 AM

सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसत आहेत.

व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी मध आणि आले ठरतील रामबाण उपाय!
आले आणि मध
Follow us on

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. त्यामध्येही सर्दी आणि ताप होऊ नये. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लमेटरी गुण असतात. जे ताप आणि सर्दीपासून बचाव होण्यासाठी फायदेशीर ठरतात. सोबतच घशात होणारी खवखव, श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासापासूनही आपण बचाव करू शकतात. व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी मध आणि आलं हे एक उत्तम पर्याय आहे असे म्हटंले तर वावगे ठरणार नाही. (Honey and ginger are beneficial for avoiding viral infections)

आल्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय सर्दी आणि खोकल्यातदेखील आले खूप फायदेशीर ठरते. आल्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत.

-तुम्हाला जर खोकल्याचा त्रास होत असेलतर आल्याचे साल उन्हात वाळवा आणि मिक्सरमधून काढा आणि त्याची पूड बनवा. जेव्हा जेव्हा खोकल्याची समस्या उद्भते तेव्हा आल्याची सालची पावडर आणि मध मिक्स करा यामध्ये कोमट टाका. यामुळे तुमचा खोकला जाईल.

-आयुर्वेदात आल्याचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. शतकानुशतके आल्याचा चहाचे सेवन केले जात आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत. आल्याचे आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो.

-घसा खवखवणे या समस्येतून आराम देण्यासाठी देखील मध फार प्रभावी आहे. जर, तुम्हाला घसा खवखवणे किंवा घसा दुखण्याची असेल, तर मध सेवन केल्यास खूप आराम मिळेल

– मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. कोणत्याही ठिकाणी सूज किंवा वेदना असल्यास किंवा जखम झाली असल्यास थेट त्या जागी मध लावू शकता. यामुळे भरपूर आराम मिळेल.

खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Honey and ginger are beneficial for avoiding viral infections)