
फॅशनच्या जगात दररोज एक नवीन ट्रेंड येत असतो. अशातच बहुतेक मुली कोणत्या आऊटफिटसोबत कोणते फुटवेअर घालायचे याबद्दल गोंधळलेल्या असतात. जर तुम्ही तुमच्या आऊटफिटसोबत योग्य फुटवेअर घातले तर त्यामुळे तुमचा लूक परिपुर्ण दिसतो. त्यासोबतच सुंदरता आणि कंफर्ट लक्षात घेऊन फुटवेअर निवडणे हे एक कठीण काम आहे. तुम्ही जेव्हा पारंपारिक आऊटफिट घालत असाल किंवा मॉर्डल ड्रेस घालत असाल तर त्यासोबत तूम्ही योग्य फुटवेअर निवडले नाही तर यामुळे तुमचा संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ऑफिस, कॉलेज किंवा कोणत्याही पार्टीत जाण्यासाठी परफेक्ट दिसायचे असेल तर तुमच्या ड्रेसनुसार फुटवेअर निवडा.
फुटवेअर हे एक ॲक्सेसरीसारखे आहे त्यामुळे ते तुमचा लूक परफेक्ट दिसतो. योग्य फुटवेअर निवडण्यासाठी, त्यांचा प्रकार, रंग आणि पॅटर्न यावर लक्ष देणे आवश्यक आहे. स्टाइलसोबतच आरामाचाही विचार करून फुटवेअर निवडा जेणेकरून तुमच्या पायांना ते घालण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
कुर्तीसोबत कोल्हापुरी चप्पल किंवा प्रिंट सँडल घाला
जर तुम्हाला कुर्ती किंवा सलवार सूट घालण्याची आवड असेल तर फुटवेअरकडेही विशेष लक्ष द्या. ते तुमचा लूक वाढवण्याचे काम करते. जेव्हा तुम्ही कुर्ती किंवा सूट घालता तेव्हा ते कोल्हापुरी चप्पल किंवा राजस्थानी प्रिंट शूज घाला.
शर्ट आणि जीन्ससह शूज घाला
जर तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजला गेलात तर तुम्ही बहुतेकदा शर्ट, टॉप किंवा जीन्स घालता. पण कधीकधी कोणते फुटवेअर घालायचे याबद्दल गोंधळ होतो, अशावेळेस तुम्ही फुटवेअर घालू शकता. लक्षात ठेवा की जर तुम्ही रोजच्या वापरासाठी शूज खरेदी करत असाल तर काळा, तपकिरी, पांढरा किंवा बेज रंग निवडा कारण हे रंग तुमच्या आऊटफिटला एक परिपूर्ण लूक देतात.
ड्रेससोबत हिल्सच्या सँडल घाला
जर तुम्ही पार्टीला जात असाल आणि ड्रेस घालण्याचा विचार करत असाल, तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे ब्लॅक ब्लॉक हील्स किंवा ब्लॅक लेस हील्स जे तुमचा लूक वाढवू शकतात. पण जर तुम्ही ऑफिसमध्ये ड्रेस घालत असाल आणि तुम्हाला आरामदायी लूक हवा असेल तर तुम्ही शूज किंवा सँडल घालू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)