आयुष्यात घरात कधीच होणार नाहीत माशा, किचनमधील या वस्तू वापरा, कायमचं टेन्शन मिटणार!

माशा घाणेरड्या ठिकाणी राहतात. कचरा, सडलेल्या वस्तू अशी जागा माशांना फार आवडते. म्हणूनच तुमच्या घरातही बॅक्टेरियाचा शिरकाव होतो. यामुळे तुम्हाला फुड पॉयझनिंग होऊ शकते. हगवण लागण्याची तसेच अन्य इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

आयुष्यात घरात कधीच होणार नाहीत माशा, किचनमधील या वस्तू वापरा, कायमचं टेन्शन मिटणार!
housefly home remedy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 3:46 PM

House Flies : पावसाळा सुरू झाला की घरात माशा दिसायला लागतात. घरातील किचनपासून ते बेडरुम, हॉलपर्यंत सगळीकडे माशाच माशा दिसायला लागतात. घरात माशा दिसत असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको. कारण माशा अनेक ठिकाणच्या घाणीवर बसून आलेली असते. माशी आपल्यासोबत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस घेऊन येते. यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता आहे. त्या तुमच्या अन्नावर बसतात. म्हणूनच अनेक आजार होतात. दरम्यान, अशा माशांना घरातून घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? घरच्या घरी तुम्ही नेमकं काय करू शकता? हे जाणून घेऊ या…

माशांपासून लगेच होईल सुटका फक्त…

माशा घाणेरड्या ठिकाणी राहतात. कचरा, सडलेल्या वस्तू अशी जागा माशांना फार आवडते. म्हणूनच तुमच्या घरातही बॅक्टेरियाचा शिरकाव होतो. यामुळे तुम्हाला फुड पॉयझनिंग होऊ शकते. हगवण लागण्याची तसेच अन्य इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. पण घरातील माशांपासून तुम्हाला सुटका लगेच करून घेता येते. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही जरज नसते. घरच्या घरीच एक मिश्रण तयार करून तुम्ही माशांना घरातून पळवून लावू शकता.

माशांना घरातून कसं पळवायचं?

घरात झालेल्या माशांना पळवून लावायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या घरात असणाऱ्या वस्तूंचा वापर करून तुम्ही एका मिश्रण तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी लागेल. तसेच एक चमचा साखर, व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉश तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. एका भांड्यातत एक ग्लास पाणी घ्या. या पाण्यात साखर मिसळा. त्यानं पुन्हा व्हिनेगर टाका आणि लिक्विड डिशवॉशचे काही थेंब टाकून ते मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून टाका. ज्या ठिकाणी घरात सर्वाधिक माशा आहेत, तिथ हे मिश्रण ठेवा. साखरेच्या गोडव्यामुळे माशा त्या मिश्रणाकडे आकर्षित होतात. या मिश्रणाजवळ येताच माश त्यात अडकून बसतात. त्या बाहेर पडू शकत नाहीत.

(टीप- ही फक्त प्राथमिक माहिती आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.)

Follow Us