बनावट तांदूळ कसं ओळखायचं? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धती
सध्या बाजारात अनेक गोष्टींमध्ये भेसळ ही पाहायला मिळते. मग ते दूध असो, मसाले असो, साखर असो, मीठ असो किंवा तांदूळ असो. भेसळयुक्त गोष्टी आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. अशावेळेस भेसळयुक्त वस्तू ओळखणे महत्त्वाचे आहे. तर आजच्या लेखात आपण बनावट तांदूळ ओळखण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊयात...

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा जसजसा वापर वाढत चालेला आहे, त्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात गैरवापर देखील होत आहे. याचाच वापर करून आजकाल बाजारात अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ पाहायला मिळते. त्यामुळे हे भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण भेसळयुक्त गोष्टींमध्ये हानिकारक रसायने वापरली जातात. फळे आणि भाज्यांपासून ते मीठ, साखर आणि तांदूळ, बाजारात सर्वांमध्ये भेसळ तसेच बनावट गोष्टी आढळतात. अशातच मोठ्या प्रमाणात बनावट तांदूळांची विक्री होत आहे. तर हा बनावट तांदूळ खूप स्वच्छ दिसतो, परंतु तो खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
भारतीय घरांमध्ये भात हा मुबलक प्रमाणात खाल्ला जातो. पण जर तुम्ही बनावट तांदूळ खात असाल तर त्यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अनेक गंभीर आजारांनाही आमंत्रण मिळते. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी बाजारात मिळणारा तांदूळ खरा आहे की बनावट हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखात आपण बनावट तांदूळ ओळखण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊयात…
बनावट तांदूळ ओळखण्याचे सोपे मार्ग
पाण्यात टाकून तपासा
खरा आणि बनावट तांदूळ ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याची काही तांदूळ घेऊन टाकावे लागतील. जर तांदूळ पाण्यात तळाशी जाऊन बसला तर तो खरा आहे. परंतु जर तांदूळ पाण्यात तरंगू लागला तर तो बनावट किंवा प्लास्टिकचा असू शकतो.
तांदूळा जाळून पाहा
बनावट तांदूळ ओळखण्याचा हा देखील एक मार्ग आहे. यासाठी तांदूळ घ्या आणि ते आगीवर जाळून पाहा. जर तांदळाला प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल तर ते बनावट आहे. कारण खऱ्या तांदळाला असा वास येत नाही.
तांदूळ शिजवल्यानंतर ओळखा
बनावट तांदूळ शिजवल्यानंतर तुम्ही ओळखू शकता. खरंतर जेव्हा तांदूळ प्लास्टिकचा बनलेला असतो किंवा बनावट असतो तेव्हा तो शिजण्यास खूप वेळ घेतो आणि शिजवल्यानंतरही तो कडक राहतो. तर खरा तांदूळ मऊ असतो आणि लवकर शिजतो.
ही पद्धत देखील फॉलो करा
बनावट तांदूळ ओळखण्यासाठी तांदूळ उकळत्या पाण्यात टाका. जर पाण्यात प्लास्टिकसारखा थर दिसला तर तांदूळ निश्चितच बनावट आहे. कारण खरा तांदूळ उकळत्या पाण्यात कोणत्याही प्रकारचा थर तयार करत नाही. याशिवाय गरम तेलातही तांदूळ टाकून पहा. जर तांदूळ पॉपकॉर्नसारखा फुगला आणि वर आला तर तो बनावट असू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
