तुमच्या आवडीचे केळीचे वेफर्स नेमके कसे बनतात? कुरकुरीतपणा कसा येतो? Video एकदा पाहाच
केळीचे वेफर्स बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. त्यांनी काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ पोस्ट केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बाजूला मोठ्या प्रमाणात हिरवी केळी जमा केलेली पाहायला मिळत आहेत.

हल्लीच्या काळात पॅकिंग फूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. यात वेफर्स हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. सकाळी नाश्ता म्हणून ते अगदी रात्रीच्या स्नॅक्सपर्यंत अनेकजण वेफर्स खाण्याला पसंती देतो. केळीचे वेफर्स हे केवळ चवीसाठीच नाही, तर ते बनवण्याच्या पारंपरिक प्रक्रियेसाठीही ओळखले जातात. केळीचे वेफर्स दिसायला जितके चांगले दिसतात, तितकेच ते बनवण्याची प्रक्रियाही सोपी असते. विशेष म्हणजे याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत केळीचे वेफर्स नेमके कसे बनतात याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
उविरींगियिमाना फेलिक्स या ट्वीटर अकाऊंटवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केळीचे वेफर्स बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. त्यांनी काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ पोस्ट केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बाजूला मोठ्या प्रमाणात हिरवी केळी जमा केलेली पाहायला मिळत आहेत. यानंतर एक महिला केळ्याची साल काढताना दिसत आहे. ती अतिशय वेगाने आणि फारच पटापट केळ्याची साल काढताना दिसत आहे.
केळीचे वेफर्स कसे बनवतात?
यानंतर सोललेली केळी काळी पडू नयेत आणि त्यांना आकर्षक हलका पिवळा रंग मिळावा म्हणून ती लगेचच हळदीच्या किंवा मिठाच्या पाण्यात ठेवण्यात येतात. यानंतर केळ्याचे काप करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या चिप्स बनवण्याच्या कारखान्यांमध्ये खास स्लाइसिंग मशीन (Slicing Machine) वापरली जाते. तिथे असलेले कामगार सोललेले केळे मशीनमध्ये टाकतात. ही मशीन एकावेळी हजारो अगदी पातळ, एकसमान आणि गोल काप तयार करते.
हे पातळ काप मशीनमधून बाहेर पडताच थेट तापलेल्या तेलाच्या मोठ्या कढईत पडतात. यामुळे वेफर्सला तात्काळ त्यांचा कुरकुरीतपणा मिळतो. केळ्याच्या वेफर्सची खरी चव आणि कुरकुरीतपणा तळण्यावर अवलंबून असतो. यासाठी तेल पुरेसे गरम असावे लागते, जेणेकरून वेफर्स आतून आणि बाहेरून पटकन कुरकुरीत होतील. हे केळ्याचे काप तळले जात असताना त्या कंपनीत काम करणारा एक कामगार मोठ्या झाऱ्याने ते सतत ढवळत असल्याचे दिसत आहे. यावेळी वेफर्सचा रंग सोनेरी पिवळा होण्यास सुरुवात होतो. ते कुरकुरीत झाले म्हणजे ते पूर्णपणे तळले गेले असा त्याचा अर्थ होतो.
This is how to cook banana chips recipe. pic.twitter.com/jCqv23qC3q
— Uwiringiyimana Felix (@UwiriFelix) December 4, 2025
हे तळलेले क्रिस्पी वेफर्स लगेच तेलातून काढून एका मोठ्या धातूच्या भांड्यात जमा केले जातात. हे वेफर्स गरम असतानाच, त्यांच्यावर बारीक मीठ आणि आवडीनुसार काळी मिरी किंवा लाल तिखट टाकले जाते. हे मसाले वेफर्स समप्रमाणात लागावे म्हणून ते हाताने मिक्स करतात. यानंतर ते व्यवस्थित पॅकिंग करुन दुकानात विक्रीसाठी पाठवले जातात.
