बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय सांगितले आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

रामदेव बाबा हे भारतातील सर्वात मोठे योगगुरु आहेत. ते योग शिकवतात, तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींद्वारे आरोग्याच्या समस्या सोडवण्यातही मदत करतात. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय सांगितले आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
बद्धकोष्ठतेमुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही, यामुळे लोकांच्या दिनचर्येवर परिणाम होतो. बद्धकोष्ठतेमुळे दररोज शौचास त्रास होतो, त्यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. आहारात फायबरयुक्त अन्नाची कमतरता असल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तसेच तणावामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मात्र काही आयुर्वेदिक वनस्पतींद्वारे तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करणे घातक
बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केल्यास मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो तसेच आतड्यांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी फायबरयुक्त अन्न खा, भरपूर पाणी प्या आणि नियमित व्यायाम किंवा योगा करणे फायदेशीर ठरेल.
बाबा रामदेव बाबांनी सांगितला उपाय
बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळविण्यासाठी नाशपाती हे फळ फायदेशीर असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज एक ग्लास नाशपातीचा रस प्यावा किंवा ते फळ चघळून खावा. यामुळे अर्ध्या ते एक तासात पोट साफ होते असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
नाशपाती का फायदेशीर?
मध्यम आकाराच्या नाशपातीमध्ये 1 ग्रॅम प्रोटीन आणि 101 कॅलरीज असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के, पोटॅशियम देखील असते. नाशपाती खाल्ल्याने 6 ग्रॅम फायबर मिळते जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्यामुळे हे फळ खूप महत्वाचे आहे.
ही फळेही फायदे फायदेशीर
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आंबा आणि पेरू हे देखील फायदेशीर असल्याचे रामदेव बाबांनी म्हटलं आहे. मात्र ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी आंबा खाऊ नये असा सल्लाही रामदेव बाबांनी दिला.
