
पहिल्यांदा लिहायला शिकणे ही प्रत्येक मुलासाठी एक नवीन सुरुवात असते. त्याचबरोबर मुलांना योग्य पद्धतीने लिहायला शिकवणे हे पालकांसाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. बहुतेक पालकांना समजत नाही की आपल्या मुलांना लिहण्याची सुरुवात कशी करावी. जर तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. बालरोगतज्ञांनी मुलांना लिहायला शिकवण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाचे हस्ताक्षर सुधारू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या ट्रिक बद्दल अधिक जाणून घेऊयात.
पालक अनेकदा आपल्या मुलांना अ, ब, क, ख, ग ही अक्षरे लिहायला शिकवतात. पहिल्यांदाच ही अक्षरे लिहत असताना मात्र मुलांवर दबाव वाढतो आणि त्यांना लिहिण्याची भीती वाटते. तर असं न करता मुलांना लिहायला शिकवण्याची सुरुवात अक्षरांनी नव्हे तर रेषा आणि एखादे चौकोन, गोलाकार असे आकार काढायला शिकवावे.
जेव्हा मुलांची बोटांनी पेन्सिल पकडण्याची पकड, हाताची हालचाल आणि डोळ्यांशी समन्वय मजबूत होतो तेव्हाच त्यांचे हस्ताक्षर चांगले विकसित होते. तर यासाठी मुलांना कागद आणि पेन्सिल द्या आणि त्यांना हवे तसे त्यावर रेखाटू द्या. ते वाकड्या रेषा काढत असोत किंवा वर्तुळाकार गोलाकार, ही त्यांची पहिली प्रॅक्टिस असते. यामुळे मुलांना पेन्सिल पकडण्याची आणि त्यांना लिहीण्याची आवड निर्माण होते.
या रेषांच्या सरावामुळे मूलं हळूहळू त्याच्या हातांची दिशा आणि दाब समजून घेण्यास शिकतात. एकदा या रेषा योग्यरित्या काढायला शिकलेत की पुढे त्यांना गोल काढायला शिकवा त्यानंतर झिगझॅग लाईन काढायला लावा किंवा लहान आकार यांचा सराव केल्याने मुलांच्या बोटांना बळकटी देतात आणि त्याला पेन्सिल धरण्याचा आत्मविश्वास पक्का होतो.
लेखन करणे ही एक प्रक्रिया आहे, कोणती स्पर्धा नाही. त्यामुळे त्यांना अ,आ, ई लिहायला शिकवण्याआधी त्यांना त्यांच्या पद्धतीने लिहण्याचा आनंद घेऊ द्या. जेव्हा एखादे मूल भीतीशिवाय कागदावर स्वतःच्या मनाने काही लिहितो तेव्हा त्यांना लिहण्यास आवड निर्माण होते. या दृष्टिकोनाचा अवलंब केल्याने, तुमचे मूलं केवळ लवकर लिहायला शिकणार नाही तर ते व्यवस्थित आणि सुंदर हस्ताक्षर देखील काढायला शिकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)