AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डार्क सर्कल्सवर उपाय काय? वाचा

आज आम्ही तुमच्यासाठी बदाम ऑईल आय मास्क घेऊन आलो आहोत. बदाम ऑईल आय मास्क ट्राय करून तुम्ही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवू शकता. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्याच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता.

डार्क सर्कल्सवर उपाय काय? वाचा
remove dark circelsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 02, 2023 | 6:46 PM
Share

डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. आज आम्ही तुमच्यासाठी बदाम ऑईल आय मास्क घेऊन आलो आहोत. बदाम ऑईल आय मास्क ट्राय करून तुम्ही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवू शकता. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्याच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता, तर चला जाणून घेऊया बदाम ऑइल आय मास्क कसा बनवावा आणि वापरावा.

बदाम तेलाचा मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बदाम तेल 1 टीस्पून
  • लिंबाचा रस 1/2 टीस्पून

बदाम तेलाचा आय मास्क कसा बनवावा?

  • बदाम तेलाचाआय मास्क तयार करण्यासाठी, प्रथम एक छोटी वाटी घ्या.
  • नंतर त्यात एक चमचा बदाम तेल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.
  • त्यानंतर हे दोन्ही नीट मिक्स करून गुळगुळीत मिश्रण तयार करावे.
  • आता तुमचा बदाम ऑईल आय मास्क तयार आहे.

बदाम तेल आय मास्क कसा वापरावा?

  • बदाम ऑईल आय मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण डोळ्याखाली चांगले लावा.
  • यानंतर थोडा वेळ ते तसेच सोडून द्या.
  • त्यानंतर कॉटन पॅड किंवा साध्या पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून 2 वेळा हा आय मास्क वापरुन पहावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय