AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांची वाढवायची असेल उंची आणि हाडे करायचे असतील मजबूत तर, दुधासोबतच या पदार्थांचा करा आहारात समावेश

मुलांच्या शरीरात योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम असणे खूप महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता असल्यास याचा परिणाम मुलांच्या उंचीवरही होतो. कॅल्शियमसाठी मुलांच्या आहारात दुधाशिवाय इतरही काही पदार्थांचा समावेश करू शकता.

मुलांची वाढवायची असेल उंची आणि हाडे करायचे असतील मजबूत तर, दुधासोबतच या पदार्थांचा करा आहारात समावेश
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: Jitendra Zavar | Updated on: Feb 24, 2025 | 1:42 PM
Share

लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कॅल्शियम मुलांची हाडे आणि दात मजबूत करण्याचे काम करते. पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यास त्याचा मुलांच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि त्याशिवाय मानसिक विकासही खुंटतो. लोक आपल्या दैनंदिन दिनचर्येत मुलांना दूध देतात, पण जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांच्या आहारात दुधाव्यतिरिक्त काही पदार्थांचा समावेश करावा. जेणेकरून शरीरातील कॅल्शियमची कमतरता योग्य प्रमाणात भरून काढता येईल.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची वाढ चांगली व्हावी असे वाटते आणि अनेकदा असे दिसून येते की पालक आपल्या मुलांच्या उंचीबद्दल खूप काळजीत असतात. उंची योग्य प्रकारे वाढण्यासाठी मुलांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. अशाच पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यात कॅल्शियम सोबत प्रथिने आणि इतर पोषक तत्वे भरपूर असतात.

दुग्धजन्य पदार्थ

मुलांना दररोज एक ग्लास दुधाव्यतिरिक्त चीज, गावरान तूप, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा. हे कॅल्शियम आणि प्रथिनांसह व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत आहेत.

आहारात अंड्याचा समावेश करा

मुलांच्या आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी अंड्यांचा समावेश करा. अंडी हे कॅल्शियम सोबत प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडे तसेच स्नायू मजबूत होतात. डोळ्यांच्या दृष्टीसाठीही हे उत्तम अन्न आहे.

सोयाबीन

मुलांच्या आहारात तुम्ही सोयाबीनचा समावेश करू शकता. हे कॅल्शियम आणि वनस्पती आधारित प्रथिन्यांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. सोयाबीनच्या भाजीशिवाय तुम्ही सोया मिल्क, टोफू यासारख्या गोष्टी मुलांना खाऊ घालू शकता. त्यामुळे हाडे आणि स्नायूंची ताकद वाढते.

भिजवलेले बदाम

मुलांना रोज सकाळी पाण्यात भिजवलेले तीन ते चार बदाम खायला द्यावेत. मात्र, वयानुसार प्रमाण लक्षात ठेवा. कॅल्शियम आणि प्रथिने व्यतिरिक्त, बदाम हे चांगल्या चरबीचा स्रोत आहे ज्यामुळे मुलांची स्मरणशक्ती देखील वाढते.

पालक

पालक हा पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. मुलांच्या आहारात तुम्ही पालकाचा समावेश करू शकता. कॅल्शियमसह, लोह आणि व्हिटॅमिन सी चा हा उत्कृष्ट स्रोत आहे. मुलांना पालक थेट खायचा नसतो म्हणून पालक पराठा किंवा सूप तयार करून मुलांना देऊ शकता.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी