AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parenting Tips | मुलांवर कशाला डाफरता, पालकांनी लक्षात ठेवाव्यात ‘ या ‘ गोष्टी

Parenting Tips | पालकांच्या ओरड्याचा मुलांवर खूप परिणाम होतो. विशेषत: जेव्हा इतर लोकांसमोर ओरडा बसतो, तेव्हा आणखीनच वाईट वाटते. सार्वजनिक ठिकाणी मुलांना ओरडल्यास त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो.

Parenting Tips | मुलांवर कशाला डाफरता, पालकांनी लक्षात ठेवाव्यात ' या ' गोष्टी
मुलांना समजून घ्याImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 15, 2022 | 3:26 PM
Share

Parenting Tips | प्रत्येक मुलाचं बालपण (kids) खूप मजेशीर आणि खोडकर असतं. खोडकरपणामुळे त्यांना ओरडा बसतो. पालक (parents scold kids) मुलांना रागावतातच किंवा खडसावतात. मात्र, पालकांच्या अशा वागण्याचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. विशेषत: जेव्हा इतर लोकांसमोर ओरडा बसतो, तेव्हा आणखीनच वाईट वाटते.

मानसिक ताण येतो

सार्वजनिक ठिकाणी मुलांना ओरडल्यास त्यांच्यावर मानसिक ताण (mental pressure) येऊ शकतो. अनेकदा मुलं दुसऱ्या व्यक्तींसमोर जायलाही घाबरतात किंवा मग सगळ्या व्यक्तींसमोरच राग दर्शवतात.त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेऊया.

मुलं रागीट होऊ शकतात

मुलांचे मन अतिशय कोमल, मृदू असते, ते कोणतीही गोष्ट लावून घेतात. अशा परिस्थितीत मुलांना सार्वजनिक ठिकाणी ओरडल्यास त्यांना राग येऊ शकतो. हेल्थलाइन नुसार, मुलांवर ओरडल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. विशेषत: इतरांसमोर ओरडा बसल्यास मूल हट्टी आणि रागीट होऊ शकतं. पालकांच्या रागामुळे मुलांचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी ओरडू नये.

वाढू शकतो तणाव

रागावल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक विकार होऊ शकतात, त्यापैकी एक म्हणजे अधिक ताण जाणवणे. अधिक ताणामुळे मुलांच्या वागण्यात बदल होत असतो. तणावामुळे मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. मुलांना दुसऱ्यांसमोर रागावल्याने त्यांचा अपमान होतो, ज्यामुळे ते पालकांपासून गोष्टी लपवू लागतात. हे तणावाचे एक प्रमुख कारण असू शकते.

शारीरिक आरोग्यावर होतो परिणाम

इतर व्यक्तींसमोर मुलांवर ओरडल्याने मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. आई-वडिल मुलांना ओरडल्यास ते शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतत. शारीरिकरित्या कमकुवत झाल्यामुळे मुलं इतरांना टाळू लागतात व त्यांना भावनिक व शारीरिकदृष्ट्या कमजोर वाटू लागतं. अनेक वेळा तणावामुळे मुले आजारीही पडतात. त्यामुळे पालकांनी मुलांना ओरडणं टाळावं, विशेषत: इतर लोकांसमोर ओरडू नये. मुलांना त्यांची चूक प्रेमान समजवावी व त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.