AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटावरच्या चरबीमुळे त्रस्त आहात, मग ‘या’ टिप्स फाॅलो करा

लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे.

पोटावरच्या चरबीमुळे त्रस्त आहात, मग 'या' टिप्स फाॅलो करा
पोटावरची चरबी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 20, 2021 | 8:37 AM
Share

मुंबई : लठ्ठपणा नको आणि निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर तुम्ही काय खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहारात बदल करावा लागतो. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण पौष्टिक अन्नापेक्षा फास्ट फूड आणि पॅक केलेल्या अन्नाचा जास्त वापर करतो. यामुळे पोटावर चरबी तयार होते. (If you are suffering from belly fat then follow these tips)

ही चरबी कमी करणे सोपे काम नाही, परंतु आपण जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवले तर पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. पोटावरच्या वाढलेल्या चरबीमुळे आपल्याला टाइप -2 मधुमेहाचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, सर्व संशोधनात असेही समोर आले आहे की पोटावर जास्त चरबी ठेवल्यास हाय बीपी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

-पोटाची चरबी कमी करण्यासाठी पालक खाणे खूप चांगले आहे. पालकांमध्ये फायबर व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असते आणि त्यात भरपूर फायबर असतात. यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासाठी आजच आपल्या आहारात पालकाचा समावेश करा.

-ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्सदेखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. साधारण 150 रुपये किलो असणारे ओट्स बाजारात सहज उपलब्ध होतात आणि ओट्स खाल्लाने तुमचे वजनही कमी होते.

-दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला.

-उन्हाळ्याच्या हंगामात काकडी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज काकडी खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही. काकडीमध्ये 80 टक्के पेक्षा जास्त पाणी असते जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

-रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात हिरव्या भाज्या आणि चपाती यांचा समावेश करा. ओल्या भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या घ्या, पण रात्रीच्या जेवणात केवळ एकच चपाती खा. किंवा याला पर्याय म्हणून आपण व्हेजिटेबल दलिया, व्हेजिटेबल ओट्स, कच्चा पनीर इत्यादी पदार्थ देखील खाऊ शकता

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

संबंधित बातम्या : 

(If you are suffering from belly fat then follow these tips)

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...