वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? तर मग ‘हे’ खाणे टाळाच

| Updated on: Mar 15, 2021 | 3:30 PM

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? तर मग हे खाणे टाळाच
Follow us on

मुंबई : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. त्यांच्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही चुकूनही आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करू नका. (If you are trying to lose weight, do not eat this food)

-अनेक लोकांना द्राक्ष खूप खायला आवडतात. द्राक्ष आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहेत. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर ठरतात. ते आपल्या शरीराला बर्‍याच प्रकारे फायदा देतात. आयुर्वेदात द्राक्षाला आरोग्याचा खजिना म्हणून वर्णन केले गेले जाते. मात्र, ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी द्राक्ष खाणे शक्यतो टाळावे कारण 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 67 कॅलरी आणि 16 ग्रॅम नैसर्गिक साखर असते. याचा अर्थ असा की द्राक्षांचे नियमित सेवन केल्यास वजन वाढू शकते.

-केळी पोटॅशियमने समृद्ध असतात. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. मात्र, केळीमध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात, जे जवळ जवळ 37.5 ग्रॅम कार्बोहायड्रेटच्या बरोबर असतात. म्हणून जर तुम्ही दररोज २ ते ३ केळी खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

-एक कप आंब्याच्या तुकड्यात 99 कॅलरी असतात, जे मुख्यतव्ये कर्बोदके असतात. यामुळे आपल्याला एकाच सर्व्हिंगमध्ये 25 ग्रॅम कार्ब्स मिळतील. त्यापैकी सुमारे 23 ग्रॅम नैसर्गिकरित्या साखर असते आणि 3 ग्रॅम फायबर असते. म्हणून वजन कमी करणाऱ्यांनी शक्यतो आंबा खाणे टाळले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!

Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!

(If you are trying to lose weight, do not eat this food)