डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? तर ‘ही’ खास माहिती तुमच्यासाठी!

| Updated on: Mar 15, 2021 | 2:36 PM

आपली खराब जीवनशैली आपल्या खाण्यापिण्यावरही परिणाम करते. यामुळे आपल्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात

डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? तर ही खास माहिती तुमच्यासाठी!
Follow us on

मुंबई : आपली खराब जीवनशैली आपल्या खाण्यापिण्यावरही परिणाम करते. यामुळे आपल्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. सतत संगणक, मोबाईल आणि लॅपटाॅपवर काम केल्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढते. डोकेदुखीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळी औषधे देखील घेतात. नेहमीच डोकेदुखीसाठी औषध घेणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. डोकेदुखीतून मुक्त व्हायचे आहे तर आज आम्ही तुम्हाला घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची डोकेदुखीची समस्या दूर होईल.  (If you suffering from headaches use these home remdies)

-अदरक चहा पिणे खूप जणांना आवडतो. असे अनेकजण असे आहेत की, त्यांना दिवसांतून 7-8 वेळा चहा घेण्याची सवय आहे. त्यामध्येही विशेष करून अदरकचा चहा डोक जड पडल्यावर आणि सर्दी झाल्यावर घेतला जातो. अदरकचा चहा आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. डोके दुखत असल्यावर अदरकचा चहा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

-लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकते. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायले पाहिजे. तसेच डोके दुखत असल्यावर लिंबू पाणी पिणे चांगले असते.

-काॅफीमध्ये कमी कॅलरी असतात. म्हणूनच डाएटिशन्स आपल्याला ब्लॅक कॉफी पिण्याची शिफारस करतात. ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीची संख्या अवघी 2 ते 3 असते. त्यात खनिज व प्रथिने कमी प्रमाणात असतात. कॉफी पिण्यामुळे आपल्याला फार काळ भूक लागत नाही. डोके दुखीसाठी कॉफी एक उत्तम पर्याय आहे. डोके दुखीवेळी कॉफी घेतली तर तुम्हाला फ्रेश झाल्यासारखे वाटेल.

संबंधित बातम्या : 

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

(If you suffering from headaches use these home remdies)