AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकटपणामुळे उन्हाळ्यात केसांसाठी खोबरेल तेल वापरणे टाळता ? हे उपाय करून पहा, मिळतील मजबूत केस

उन्हाळ्यात केसांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत तुम्ही खोबरेल तेलाचाही अनेक प्रकारे वापर करू शकता. नारळ तेलाचा वापर कोणत्या प्रकारे करावा ते जाणून घेऊया.

चिकटपणामुळे उन्हाळ्यात केसांसाठी खोबरेल तेल वापरणे टाळता ? हे उपाय करून पहा, मिळतील मजबूत केस
Image Credit source: freepik
| Updated on: May 17, 2023 | 5:10 PM
Share

Coconut Oil : नारळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना (Coconut Oil) आपल्या निरोगी आणि मुलायम (strong hair) बनवण्यास मदत करते. दमट हवामानात केस कोरडे आणि निर्जीव (dry hair)होतात. खोबरेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. अनेकजण उन्हाळ्यात चिकटपणामुळे केसांसाठी तेल वापरणे टाळतात. पण केस निरोगी ठेवण्यासाठी तेलाचा वापर खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर इतरही अनेक प्रकारे करू शकता. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतात.

अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये मिसळून तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यामुळे उन्हाळ्यात केसांना अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात नारळाच्या तेलाचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते जाणून घेऊया.

खोबरेल तेल थोडे गरम करा. या तेलाने स्कॅल्पला 5 ते 6 मिनिटे मसाज करा. यानंतर थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी केस सौम्य शांपूने धुवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा खोबरेल तेल वापरू शकता.

नारळाचे तेल व कोरफड

केसांसाठी तुम्ही कोरफड आणि खोबरेल तेल देखील वापरू शकता. यासाठी 2 चमचे नारळाचे तेल आणि 2 चमचे कोरफडीचा रस हा एका बाऊलमध्ये घ्या व नीट एकत्र करा. आता हे मिश्रण लावून स्काल्पला थोडा वेळ मसाज करा. यानंतर कोरफड आणि खोबरेल तेलाचे मिश्रण काढून टाका. तुम्ही ते अर्ध्या तासासाठी टाळूवर ठेवू शकता. नंतर केस सौम्य शांपूने धुवा.

दही व नारळाचे तेल

तुम्ही दही आणि खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी एका भांड्यात 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात अर्धी वाटी दही घाला. या दोन्ही गोष्टी मिसळा आणि केस आणि टाळूला लावा. दही आणि खोबरेल तेलाचे मिश्रण टाळूवर तासभर राहू द्या. तुम्ही दही आणि खोबरेल तेलाचे मिश्रण आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

लिंबाचा रस व नारळाच्या तेलाचा वापर

एका भांड्यात 3 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. या दोन गोष्टी मिसळून टाळूला मसाज करा. आपण लिंबू आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण वापरू शकता. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हे मिश्रण आठवड्यातून 2 वेळा वापरले जाऊ शकते.

राज ठाकरे - शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांकडून मोठा खुलासा
राज ठाकरे - शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांकडून मोठा खुलासा.
शिंदेंशी भांडण कायम राहणार; संजय राऊतांनी स्पष्ट सांगूनच टाकलं!
शिंदेंशी भांडण कायम राहणार; संजय राऊतांनी स्पष्ट सांगूनच टाकलं!.
दिल्ली ते महाराष्ट्र... रयतेच्या राजाला मानाचा मुजरा!
दिल्ली ते महाराष्ट्र... रयतेच्या राजाला मानाचा मुजरा!.
शिवजयंतीनिमित्त शिवनेरी दुमदुमली; जल्लोष आणि उत्साहाला उधाण
शिवजयंतीनिमित्त शिवनेरी दुमदुमली; जल्लोष आणि उत्साहाला उधाण.
शिव-शाहू-फुले, आंबेडकरांचा वारसा विसरणार नाही! सुनेत्रा पवारांचं भाषण
शिव-शाहू-फुले, आंबेडकरांचा वारसा विसरणार नाही! सुनेत्रा पवारांचं भाषण.
राज्यभर शिवजयंतीचा जल्लोष; पंतप्रधान मोदींचे शिवरायांना साष्टांग नमन
राज्यभर शिवजयंतीचा जल्लोष; पंतप्रधान मोदींचे शिवरायांना साष्टांग नमन.
पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना यांच्याकडून अभिवादन
पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना यांच्याकडून अभिवादन.
विलीनीकरणाच्या कनेक्शनमधून अपघाताचा कट, रोहित पवारांचा नवा आरोप
विलीनीकरणाच्या कनेक्शनमधून अपघाताचा कट, रोहित पवारांचा नवा आरोप.
लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा भव्य सोहळा! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी
लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा भव्य सोहळा! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी.
राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, 7 जागांसाठी होणार निवडणूक
राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, 7 जागांसाठी होणार निवडणूक.