AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food For Healthy Bones : हाडांमधून येत असेल कट-कट आवाज तर आजपासून खायला लागा हे पदार्थ

जर तुमची हाडं कमकुवत झाली असतील आणि त्यातून कट-कट आवाज येत असेल तर आजपासूनच आहारात या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

Food For Healthy Bones : हाडांमधून येत असेल कट-कट आवाज तर आजपासून खायला लागा हे पदार्थ
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 11, 2023 | 12:08 PM
Share

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023  : धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे शरीर आतून पोकळ होऊन अनेक तऱ्हेचे गंभीर आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर यामुळे आपल्या शरीरातील हाडंही (weak Bones) कमकुवत होतात. याच कारणामुळे आजकाल कमी वयातच काही लोकं हाडांशी संबधित समस्येमुळे त्रासलेले असतात.

खरंतर शरीरात पोषक तत्वांचा अभाव असेल तर हाडांशी संबंधित आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीमध्ये आहारात काही पदार्थांचा (Healthy Bones Diet ) समावेश केला तर हाडांचे आरोग्य सुधारून ती स्ट्राँग किंवा मजबूत होतात. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

नाचणी

100 ग्रॅम नाचणीमध्ये 345 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश केल्यास शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळते. त्यासाठी तुम्ही नाचणीच्या पिठाची भाकरी, डोसा किंवा लाडू करून खाऊ शकता.

बीन्स

हाडं पोकळ होऊ नयेत यासाठी प्रथिने, फायबर, कॅल्शियमने भरपूर अशा बीन्सचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. बीन्स हे सुपरफूडमध्ये गणले जाते आणि ज्यांच्या पायातून कट-कट असा आवाज येतो, त्यांनी तर बीन्स लगेचच खाणे सुरू करावे.

सोयाबीन

आपली हाडं मजबूत करण्यासाठी सोयाबीनचा आहारात समावेश करावा, याशिवाय तुम्ही टोफूचाही वापर करू शकता. 100 ग्रॅम टोफूमध्ये 350 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही सॅलडमध्ये टोफूचा समावेश करू शकता.

ड्रायफ्रुट्स

हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात मूठभर सुक्या मेव्याचा समावेश केल्यासही नक्कीच फायदा होईल. त्यातही बदाम आणि अक्रोड खाणे आवश्यक आहे. बदाम भिजवून दुधासोबत खाल्ल्याने अधिक फायदे होतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

दुग्धजन्य पदार्थ

तसेच आपण आहारात दुग्धजन्य पदार्थांचा अवश्य समावेश केला पाहिजे. रोजच्या रोज दूध पिणे, दही आणि पनीर यांचे सेवन करणे हे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे हाडं तर मजबूत होतातचं पण आपलं शरीरही निरोगी राहतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.