AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कशी दिसते ‘तेरे नाम’मधील ही अभिनेत्री? लेटेस्ट लुक पाहून सर्वच थक्क, जाग्या होतील जुन्या आठवणी

'तेरे नाम' चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री आता कशी दिसते? लेटेस्ट फोटो पाहून चाहते थक्क. तुम्ही देखील व्हाल चकित.

कशी दिसते 'तेरे नाम'मधील ही अभिनेत्री? लेटेस्ट लुक पाहून सर्वच थक्क, जाग्या होतील जुन्या आठवणी
Image Credit source: Social media
| Updated on: May 18, 2026 | 5:02 PM
Share

Bollywood Actress : सलमान खानच्या सुपरहिट ‘तेरे नाम’ या चित्रपटातून ‘निरजरा’ची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवणारी भूमिका चावला सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर अभिनेत्री नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली आणि तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

भूमिकाला पाहताच अनेक चाहते जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. विशेषतः ‘तेरे नाम’मधील तिच्या साध्या आणि निरागस भूमिकेची आठवण चाहत्यांनी कमेंट्समधून व्यक्त केली. भूमिका चावला नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती अतिशय साध्या आणि आकर्षक लूकमध्ये दिसून आली. तिने पांढऱ्या टॉपसोबत ब्लॅक ट्राउझर परिधान केला होता. नो-मेकअप लूकमध्येही तिचे सौंदर्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होते.

तिचे व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला. अनेकांनी 2000 च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला. काही चाहत्यांनी ‘तेरे नाम 2’ची मागणीही केली. एका युजरने, आता तरी ‘तेरे नाम 2’ बनवा अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, ही मला आजही सर्वात निरागस अभिनेत्री वाटते असे म्हटले. आणखी एका चाहत्याने, सलमान आणि भूमिका यांची जोडी आजही विसरता येत नाही अशी कमेंट केली.

‘तेरे नाम’मुळे मिळाली मोठी ओळख

2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तेरे नाम’ हा चित्रपट सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वात आयकॉनिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा इमोशनल ड्रामा बॉक्स ऑफिसवर मोठा हिट ठरला होता. या चित्रपटात भूमिका चावलाने ‘निरजरा’ ही साधी, निरागस आणि भावनिक भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. विशेष म्हणजे याच चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सलमान खान आणि भूमिका चावला यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आजही या चित्रपटातील संवाद, गाणी आणि भावनिक कथा प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. ‘तेरे नाम’नंतर भूमिका चावला पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिल ने जिसे अपना कहा या चित्रपटात झळकली होती. मात्र त्यानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत फार कमी काम केले आणि साऊथ इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग