तुमच्या आहारात समाविष्ट करा ‘हे’ 5 अनोखे सॅलड, टेस्टसह मिळेल पोषण
जेव्हा जेव्हा सॅलड हा शब्द येतो तेव्हा आपण काकडी, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून त्यापासून सॅलड बनवून खात असतो. पण आजच्या या लेखात आपण पाच वेगवेगळ्या प्रकारच्या अनोख्या सॅलडबद्दल जाणून घेणार आहोत, जे उत्तम चवीसह आपल्या आरोग्याला अधिक फायदेशीर आणि पौष्टिक आहे.

बदलत्या जीवनशैलीत अनेकजण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात जेवणासोबत सॅलडचे सेवन करत असतात. तर काही लोक डाएट करताना सॅलड खातात. सहसा जेव्हा आपण सॅलडचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी काकडी, टोमॅटो आणि कांदा यांचा सॅलड बनवला जातो. पण योग्यरित्या आणि नवीन पद्धतीने तयार केल्यावर, सॅलड हा केवळ डाएट फूड नसतो, तर तो एक चविष्ट नाश्ता किंवा हलका जेवण देखील असू शकतो.
जर तुम्हाला रोज तेच सॅलड खाऊन कंटाळा आला असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात आपण काही सॅलड रेसिपी जाणून घेणार आहोत जे चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही आहेत. त्यात हे सॅलड बनवायला देखील सोपे आहेत. चला तर आपण पाच सोप्या सॅलड रेसिपी आणि त्यांचे फायदे जाणून घेऊयात.
मेडिटेरेनियन सॅलड
मेडिटेरेनियन सॅलडमध्ये भाज्या आणि चणे भरपूर प्रमाणात असतात, जे विविध पोषक तत्वे प्रदान करतात. यामध्ये चणे असल्याने ते प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत. मेडिटेरेनियन सॅलड बनवण्यासाठी एका भांड्यात लेट्यूसची पाने, काकडी, टोमॅटो, कांदा, लाल भोपळी मिरची आणि ऑलिव्ह टाकूल एकत्र करा. दुसऱ्या भांड्यात व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल, लसूण, मिरची आणि काही मसाले टाका. आता तयार मिश्रण सॅलडवर टाकून सर्व सॅलड मिक्स करा आणि सर्व्ह करा. या सॅलडची चव अप्रतिम लागते.
नटी ग्रीन सॅलड हा देखील एक चांगला पर्याय आहे
नटी ग्रीन हे सॅलड पोषक तत्वांनी समृद्ध आहे. या सॅलडच्या सेवनाने तुमच्या शरीराला कॅलरीज, सोडियम, फायबर आणि प्रथिने यासह विविध पोषक तत्वे प्रदान करते. तर हे नटी ग्रीन सॅलड बनवण्यासाठी एका भांड्यात हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि पेकन नट्स मिक्स करा. त्यात लिंबाचा रस, व्हिनेगर, मीठ आणि मिरपूड टाका आणि मिक्स करा आणि सर्व्ह करा.
साधे इटालियन सॅलड
इटालियन सॅलड हे कमी कॅलरीज असलेले सॅलड आहे. इटालियन सॅलड बनवण्यासाठी तुम्हाला चेरी टोमॅटो, परमेसन चीज, कापलेले कांदे, लेट्यूस, ऑलिव्ह आणि पेपरोनी आवश्यक आहेत. नंतर, इटालियन मसाला या भाज्यांमध्ये टाका आणि ते बटर लावलेल्या पॅनमध्ये हलके परतून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा. या सॅलडच्या सेवनाने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.
ग्रीक सॅलडमध्येही भरपूर पौष्टिकता असते
ग्रीक सॅलड बनवायला खूप सोपे आहे. फक्त काकडी, कांदा आणि ऑलिव्ह एकत्र करा. नंतर यात चवीनुसार मसाला तयार करा. व्हिनेगरमध्ये मीठ, मिरपूड आणि ओरेगॅनो सॅलडमध्ये एकत्र मिक्स करा आणि सर्व्ह करा. हवे असल्यास तुम्ही सॅलडवर किसलेले चीज टाकू शकता, ज्यामुळे तुम्हाला प्रथिने आणि विविध पोषक तत्वे मिळतात. तसेच हे सॅलड तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये 3दिवसांपर्यंत ठेऊ शकता.
दही काकडीची सॅलड अप्रतिम आहे
दही काकडीची सॅलड ही उन्हाळ्याची एक उत्तम डिश आहे. कारण या सॅलडच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. तर यामध्ये काकडी आणि दही वापरले जाते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उत्कृष्ट असतात. सॅलड बनवण्यासाठी, फक्त काकडीचे बारीक तुकडे करा आणि ते दह्यामध्ये मिक्स करा. यात तुमचे आवडते मसाले टाका आणि सर्व्ह करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)