Indoor Plants | ‘या’ इनडोअर वनस्पती तुम्हाला हवेतील विषारी घटकांपासून ठेवतील दूर

नासाच्या संशोधनात हवा शुद्ध करणाऱ्या काही वनस्पतींविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच इतर संशोधनातही याची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. Indoor Plants

Indoor Plants | 'या' इनडोअर वनस्पती तुम्हाला हवेतील विषारी घटकांपासून ठेवतील दूर
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 2:32 PM

वाढत्या प्रदूषणामुळे शहरांमध्ये स्वच्छ हवा मिळणं अवघड होऊन बसलं आहे. शहरांमध्येही प्रदूषण, धूराचं साम्राज्य आपल्याला पाहयाला मिळते. शहरातील जीवन आरोग्यदायी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था नासानं 1989 मध्ये एका संशोधनात घरांमध्ये कुंड्यामध्ये लावता येणाऱ्या वनस्पतींविषयी माहिती दिली. या माहितीनुसार त्या वनस्पती घरातील हवा स्वच्छ करण्याचे काम करतात आणि हवेतील बॅन्जीन आणि फॉर्मलडीहाईड सारखी केमिकल्स नष्ट करतात.

नासाच्या संशोधनात हवा शुद्ध करणाऱ्या काही वनस्पतींविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच इतर संशोधनातही याची वैशिष्ट्ये समोर आली आहेत.

गोल्डन पाथोस( मनी प्लांट) गोल्डन पाथोस ला मनी प्लांट म्हणूनही ओळखले जाते. अनेक घरांमध्ये मनी प्लांट आपल्याला पाहायला मिळतो. मनी प्लांटचा हवा शुद्धीकरणासाठी फायदेशीर ठरतो. हवेतील बॅन्जीन, फॉर्मल्डीहायड, सारखी हवेतील धोकादायक केमिकल् नष्ट करण्याचं काम मनी प्लांट वनस्पती करते.

इंग्लिश आयव्ही

घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी इंग्लिश आयव्ही ही वनस्पती उपयुक्त ठरते. यासोबतच हवा शुद्धीकरणासाठीही या वनस्पतीचा उपयोग होतो. हवेतील धूळ कमी करण्याचं काम इंग्लिश आयव्ही वनस्पती करते. ही वनस्पती खिडकीत सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी ठेवली पाहिजे.

बॉस्टन फर्न प्लांट इनडोअर वनस्पतींमध्ये बॉस्टन फर्न प्लांट सर्वात सुंदर वनस्पती आहे. बॉस्टन फर्न हवेतील फॉर्मल्डीहायड,टोल्यून यासारख्या केमिकल्सचा नाश करते. तर, हवेतील जंतूचा नाश करते. सिगरेटच्या धुरातील धोकादायक गोष्टी नष्ट करण्याची क्षमता बॉस्टन फर्नमध्ये आहे.

पीस लीली पीस लीली ही वनस्पती हवेतील विषारी कार्बन मोनॉक्साईड शोषून घेण्याचं काम करते. हवेतील बॅन्झीन, फॉर्मल्डीहायड, अमोनिया, टोल्यून, झायलीन यासारखे विषारी घटक नष्ट करते. या वनस्पतीला जास्त पाणी आणि सूर्य प्रकाश गरजेचा असतो. ही वनस्पती बुरशीवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

रबर प्लांट घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्या वनस्पतीची गरज असल्यास रबर प्लांट ही वनस्पती उपयुक्त आहे. रबर प्लांट वनस्पती ऑक्सिजन उत्सर्जनाचं काम करते. हवेतील रासायनिक कपदार्थ नष्ट करण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. रबर प्लांटला कमी प्रमाणात पाणी दिले तरी चालते.

सेक्र प्लांट सेक्र प्लांट हवेतील कार्बन डायक्साईड शोषूण घेण्याचे काम करते. याला स्नेक प्लांटदेखील म्हटलं जाते. नासानं या वनस्पतीला सर्वोत्तम हवा शुद्ध करणारी वनस्पती म्हणून निवडलं आहे. सेक्र प्लांट हवेतील विषारी केमिकल नष्ट करण्याचं काम करते.

जरबेरा वनस्पतीदेखील कार्बन डायक्साईडचे रुपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचे काम करते.मास केन वनस्पती हवेतील विषारी घटक नष्ट करण्याचं काम करते. मास केनचा वापर मोकळ्या आणि खुल्या जागेत ठेवण्यासाठी होतो.

संबंधित बातम्या :

Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल!

Liver Health Tips | यकृत जपा, आहारात ‘या’ पाच पदार्थांचा समावेश करा

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....