AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता विमानात एअर होस्टेसनाही करता येणार फ्रिलान्सिंग! जाणून घ्या कसं ?

फ्रिलान्स एअर होस्टेस ही संकल्पना आता जगभरात लोकप्रिय होत चालली आहे. या क्षेत्रात अनंत कमाईच्या संधी उपलब्ध असल्या तरी जबाबदाऱ्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेपासून ते उच्चस्तरीय सेवा देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रावीण्य आवश्यक असते.

आता विमानात एअर होस्टेसनाही करता येणार फ्रिलान्सिंग! जाणून घ्या कसं ?
| Edited By: | Updated on: Jun 17, 2025 | 5:54 PM
Share

आजच्या डिजिटल युगात फ्रिलान्सिंग ही संकल्पना नवीन राहिलेली नाही. अनेकजण आयटी, कंटेंट रायटिंग, डिझाइनिंग यासारख्या क्षेत्रात फ्रीलान्सिंग करताना दिसतात. मात्र, एखाद्याला सांगितलं की एअर होस्टेसही फ्रीलान्स असू शकतात, तर थोडं आश्चर्य वाटेल. होय, ‘फ्रीलान्स एअर होस्टेस’ ही एक नवी व रोमांचक करिअर संधी म्हणून पुढे येत आहे.

फ्रीलान्स एअर होस्टेस म्हणजे नेमकं काय?

फ्रीलान्स एअर होस्टेस या मुख्यतः प्रायव्हेट जेट्ससाठी काम करतात. त्या कोणत्याही एका एअरलाइनला कायमस्वरूपी बांधिल नसतात. त्याऐवजी त्या विविध चार्टर कंपन्यांसाठी गरजेनुसार काम करतात. त्यांचे काम फिक्स सैलरीवर नसते, तर प्रत्येक ट्रिपनुसार त्यांना पैसे दिले जातात. प्रवास जितका जास्त तितका उत्पन्न अधिक, अशा प्रकारे त्यांचे मानधन ठरते.

काय असते प्रशिक्षण?

फ्रीलान्स एअर होस्टेस होण्यासाठी पारंपरिक प्रोफेशनल एअर होस्टेस ट्रेनिंगची गरज लागत नाही. मात्र, आवश्यक कौशल्य शिकवणारे काही विशेष अभ्यासक्रम केले जातात. हे कोर्स साधारणपणे 3.4 लाख रुपयांपर्यंत खर्चिक असतात. या प्रशिक्षणात प्रवाशांना ड्रिंक्स सर्व करणे, उत्तम प्रकारे जेवण देणे, ग्राहक सेवा कौशल्ये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाते.

एअर होस्टेसचे काम फक्त सेवा देण्यापुरते मर्यादित नसते. विमानात इमर्जन्सी परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांचे प्राण वाचवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. त्यामुळे हे प्रशिक्षण त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

कसं मिळतं काम?

फ्रीलान्स एअर होस्टेस या एक डेटाबेसमध्ये नोंदविल्या जातात. चार्टर कंपन्या जेव्हा एखाद्या खासगी प्रवासासाठी बुकिंग करतात, तेव्हा त्या याच डेटाबेसमधून फ्रीलान्स एअर होस्टेसना संपर्क करतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते की त्यांनी कोणती ट्रिप घ्यायची आणि कोणती नाही हे ठरवावे. त्यामुळे त्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याला सुद्धा पुरेसा वेळ देऊ शकतात.

फायदा काय ?

या कामात सर्वात मोठा फायदा म्हणजे फ्रीलान्स एअर होस्टेसना विविध देशांची सफर करता येते. जागतिक पातळीवर श्रीमंत आणि उच्चभ्रू प्रवाशांशी देखील त्यांना संपर्क साधण्याची संधी मिळते. त्यामुळे केवळ कमाईच नाही तर एक भव्य अनुभवसंपन्न आयुष्य जगण्याची संधीही मिळते.

पगार किती असतो?

फ्रीलान्स एअर होस्टेसना स्थिर पगार नसतो. प्रत्येक फ्लाइटनुसार त्यांना मानधन दिले जाते. काही विशेष चार्टर फ्लाइटसाठी एक ट्रिपचे मानधन लाखोंमध्येही पोहोचू शकते. तसेच टीप्स व इतर सुविधा यात अतिरिक्त उत्पन्न मिळते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.