दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर गुलाब पाण्यात ‘हे’ घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा, होतील अनेक फायदे

गुलाब पाणी अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असते. हे केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते.

दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर गुलाब पाण्यात 'हे' घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा, होतील अनेक फायदे
तजेलदार त्वचा

मुंबई : गुलाब पाणी अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असते. हे केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. तसेच, चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते. गुलाबाचे पाणी मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला गुलाब पाणी लावणे खूप फायदेशीर आहे. (It is beneficial to apply rose water on the face every night)

सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपला बराच वेळ घराबाहेरच जातो. त्यामुळे चेहऱ्यावर टॅन, धुळ असणे साहजिकच आहे. अशावेळी चेहऱ्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपला चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केला पाहिजे. यामुळे चेहऱ्यावरील खाण निघून जाण्यास मदत होते. एक चमचा गुलाब पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा चमकदार आणि स्वच्छ होईल.

गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल. गुलाब पाणी बनवण्यासाठी 250 ग्रॅम गुलाबच्या पाकळ्या घ्या.

या पाकळ्या प्रथम कोमट पाण्याने स्वच्छ करा. यानंतर एक लिटर पाण्यात या पाकळ्या घाला. एका प्लेटने हे पाण्याने भरलेले भांडे झाकून नंतर मध्यम आचेवर उकळा. हे पाणी उकळल्यानंतर गॅसची आच कमी करा आणि आणखी काही वेळ उकळू द्या. पाकळ्यांच्या रंगात हलकासा बदल झाल्यावर गॅस बंद करा. यानंतर, पाणी थंड होईपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात राहू द्या. गाळून हे पाणी एका भांड्यात किंवा बाटलीत भरा आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवा. एका आठवड्यानंतर त्याचा वापर करण्यास सुरुवात करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(It is beneficial to apply rose water on the face every night)