AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी नाश्त्यात मनुके, पपई, अननस घ्या; कोरोनाकाळात निरोगी आणि फिट राहा

सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

रोज सकाळी नाश्त्यात मनुके, पपई, अननस घ्या; कोरोनाकाळात निरोगी आणि फिट राहा
हेल्ही नाश्ता
| Edited By: | Updated on: May 24, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई : सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर न्याहारी केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. (It is beneficial to eat raisins, papaya and pineapple for breakfast)

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये नेमके काय घेतले पाहिजे. अशा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. सध्याच्या कोरोना काळात तर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खातो हे अतिशय महत्वाचे झाले आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण भिजवलेले काळे मनुके, पपई आणि अननस घेतलेच पाहिजे. यामुळे कोरोनाच्या काळातही आपण निरोगी राहू शकतो. काळे मनुके खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

काळ्या मनुक्यांमध्ये प्रथिने, कार्ब, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक घटक असतात. हे अशक्तपणापासून हृदय, बीपी, हाडे, पोट, केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. मनुकामध्ये बोरॉन हा घटक आढळतो, जो हाडांच्या विकासासाठी ओळखला जातो. या व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण देखील असते, जे हाडांची घनता मजबूत करते. ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येमध्ये काळ्या मनुका खूप उपयुक्त आहेत.

पोटॅशियम आणि फायबर हे दोन्ही घटक उच्च रक्तदाब नियंत्रित करतात, असे मानले जाते. काळ्या मनुकांमध्ये या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणत आहेत, त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. पपई हे फळ सगळीकडे सहज उपलब्ध आहे. शिवाय आजारपणात देखील पपई फायदेकारक ठरते. याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

पपईमध्ये अधिक मात्रेत व्हिटामिन A आणि व्हिटामिन C असतात. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेकारक आहे. वय वाढल्यावर आपली नजर कमी होते, पण पपईच्या नियमित सेवनाने डोळ्यांना फायदा होतो. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. अननसमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(It is beneficial to eat raisins, papaya and pineapple for breakfast)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.