सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, आयपॅड किंवा लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय घातक; वाचा महत्वाचे

| Updated on: May 24, 2021 | 8:17 AM

सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते.

सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, आयपॅड किंवा लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय घातक; वाचा महत्वाचे
झोपीतून उठल्यावर मोबाईल आणि लॅपटाॅप घेऊन बसणे घातक
Follow us on

मुंबई : सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्यासाठी घातक आहे. सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटे मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवा. सकाळी उठल्यावर मोबाईल चेक करणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे चुकीचे आहे. हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. (It is dangerous to spend time on mobile and laptop when you wake up in the morning)

या दिवसांमध्ये जीवनशैलीमध्ये तणाव खूप सामान्य गोष्ट आहे. या तणावामुळे लोकांना सतत आरोग्याशी निगडीत समस्या येत असतात. ताणतणावामुळे हृदयरोग, मधुमेह, नैराश्य, दमा यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून शक्य तितका ताणतणाव टाळा. असे केल्याने आपण व्यायामाशिवाय किंवा आहार नियंत्रणाशिवाय तंदुरुस्त राहू शकाल.
सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर देखील जाऊ शकत नाहीत.

देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी व्यायाम करणे बंद देखील केले आहे. मात्र, या कोरोनाच्या काळातच आपल्याला अधिक व्यायाम करण्याची गरज आहे. कारण या काळात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे झाले आहे. दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो. दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(It is dangerous to spend time on mobile and laptop when you wake up in the morning)