AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | ‘जम्बोकिंग’ वडापाव… खिशाला परवडणाऱ्या लोकल टू ग्लोबल फूडची चटकदार कहाणी

कागदात बांधून मिळणाऱ्या वडापावला बटरपेपरमध्ये गुंडाळलं जाण्याचा मान कसा मिळाला, याची ही सक्सेस स्टोरी. (Jumboking Vada Pav Success Story)

Special Story | 'जम्बोकिंग' वडापाव... खिशाला परवडणाऱ्या लोकल टू ग्लोबल फूडची चटकदार कहाणी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 06, 2021 | 11:51 PM
Share

वडापाव हे चार अक्षरी शब्द वाचूनसुद्धा कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं.. तुमच्यापैकी अनेकांची जीभ आताही वळवळली असेल. वडा आणि पाव हे दोन पदार्थ जणू एक दुजे के लियेच बनले आहेत. मुंबईकरांसाठी वन मील फूड असलेला वडापाव अल्पावधीतच लोकप्रिय झाला. लोकल टू ग्लोबल हा शब्द रुजण्याआधीच या इंडियन बर्गरने फक्त देशभरात नाही, तर इंग्रजांच्या मेन्यूकार्डमध्येही नाव कमावलं. बारा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत किमतीची सॉलिड रेंज असलेला हा कदाचित एकमेव भारतीय खाद्यपदार्थ असेल. वडापावला ब्रँड व्हॅल्यू देणाऱ्या अग्रणी कंपन्यांपैकी एक म्हणजे जम्बो वडापाव. कागदात बांधून मिळणाऱ्या वडापावला बटरपेपरमध्ये गुंडाळलं जाण्याचा मान कसा मिळाला, याची ही सक्सेस स्टोरी. (Jumboking Vada Pav Dheeraj Gupta Success Story)

इंडियन बर्गर रातोरात फेमस

धीरज गुप्ता हे जम्बोकिंगचे संस्थापक. 2001 मध्ये जम्बोकिंगची स्थापना झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांना विश्वास होता, की आपण विकणार तो पदार्थ मार्केटमध्ये टिकणार आहे. जम्बोकिंगच्या वडापावला सुरुवातीपासूनच खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दोन लाखांमध्ये सुरु झालेल्या या व्यवसायाची उलाढाल आता 25 कोटींच्या वर आहे. आम्ही त्याला इंडियन बर्गर म्हणतो. भरमसाठ पदार्थ विकण्याऐवजी एकाच पदार्थाला विविध पद्धतीने सादर करण्याचा आमचा मानस होता, त्यामुळे वडापाव खायचा असेल, तर जम्बोकिंगकडेच, अशी खवय्याची मानसिकता हवी, असं गुप्ता सांगतात.

स्पेशलिस्ट व्हा, गुप्ता सांगतात

वडापावसोबत समोसाही मिळावा, अशी काही ग्राहकांची मागणी होती. मात्र आम्ही मुद्दामच वडापाववर फोकस केलं, अशा शब्दात धीरज गुप्ता यांनी आपली स्ट्रॅटेजी स्पष्ट केली. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कोअर बिझनेसवर लक्ष केंद्रित करावं लागतं. एखाद्या गोष्टीचा स्पेशलिस्ट होणं लोकांना आवडतं, मात्र त्यांना अपयशाची भीती असते. त्यामुळेच ते जनरलिस्ट होतात आणि निर्णय घेण्यात वेळखाऊपणा करतात, असं धीरज गुप्ता मानतात.

एकदा व्यवसाय जोर धरु लागला, की व्यावसायिकांचं लक्ष विचलित होतं. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बुडित निघाले. संकटाचा काळ सरल्यानंतर जम्बोकिंग नव्या जोमाने व्यवसाय सुरु कंपन्यांपैकी एक असेल, अशी खात्री धीरज गुप्ता यांनी नुकतीच एका खाजगी यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती.

अनलॉकनंतर पुन्हा जम्बोकिंग सक्रिय

कोरोना अनलॉक नंतर सर्वच व्यवसायांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. रेस्टॉरंट खुली झाली आहेत. सर्वतोपरी काळजी घेऊन खाद्यविक्रेत्यांनी दुकानं सुरु केली आहेत. पुन्हा एकदा सर्वांची पावलं वडापावकडे वळू लागली आहेत. लॉकडाऊनमध्ये जीभेची चटक पुरवण्यासाठी तात्पुरते घरी वडे तळले गेले. मात्र अनलॉकनंतर वडापावच्या गाड्या पुन्हा बहरु लागल्या आहेत. खवय्यांचा लाडका जम्बोकिंगही नवी झेप घेईल, यात शंका नाही.

(Jumboking Vada Pav Dheeraj Gupta Success Story)

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...