कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये फक्त एक डिस्प्रिनची गोळी टाका; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
कपडे धुण्यासाठी बाजारात अनेक डिटर्जंट्स उपलब्ध असूनही, पांढरे कपडे पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. यावर एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय म्हणजे डिस्प्रिनची गोळी. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना फक्त एक डिसप्रिनची गोळी टाका तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

कपडे धुण्यासाठी बाजारात अनेक डिटर्जंट पावडर उपलब्ध असतात. उत्कृष्ट लिक्विड डिटर्जंट देखील उपलब्ध आहेत. पण तरीदेखील अनेकदा कपडे हवे तसे स्वच्छ निघत नाही. विशेषत: पांढऱ्या कपड्यांवरील डाग तर एका धुण्यात निघत नाही. त्यासाठी देखील अनेक जुगाड करावे लागतात आणि मेहनतही. पण यावर एक स्वस्त आणि सोपा उपाय आहे ज्यामुळे तुमचे कपडे तर निघतीलच शिवाय त्यासाठी जास्त खर्चही येणार नाही.
पांढरे कपडे स्वच्छ काढण्यासाठी
वॉशिंग मशीन आता जवळजवळ प्रत्येक घरात पाहायला मिळते. पूर्वी कपडे धुण्यासाठी तासंतास लागायचे, परंतु आता वॉशिंग मशीनच्या मदतीने जे वाळायला तासंतास लागायचे ते काही मिनिटांत करता येते. कपड्यांचा शुभ्रपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात आली आहेत, परंतु आधुनिक आणि प्रगत वॉशिंग मशीनमध्ये सर्वोत्तम डिटर्जंट्स आणि वॉश सायकल असूनही, पांढरे कपडे निघतील याची खात्री करणे जवळजवळ अशक्य आहे. तसेच कधीकधी इतर रंगांचे कपडे स्वच्छ निघण्यासाठी देखील तेवढीच मेहनत लागते.
ही एक पेनकिलर जादुई
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही त्यासाठी कोणत्याही महागड्या डिटर्जंट्सची आवश्यकता नाही. त्यासाठी ही एकच गोळी पुरेशी आहे जी बहुतेकदा अनेकांच्या घरात आढळते. ती गोळी म्हणजे डिस्प्रिन ही गोळी पांढरे कपडे चमकवू शकते. तुमच्या पांढऱ्या कपड्यांची संख्या जर एकापेक्षा जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला 325 मिलीग्राम डिस्प्रिनच्या पाच गोळ्या वापराव्या लागतील.
कपडे धुण्यासाठी गोळ्यांचा वापर कसा करावा?
गोळ्या एका मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या टबमध्ये गरम पाण्यात या गोळ्या विरघळण्यासाठी ठेवा. सर्व गोळ्या पूर्णपणे विरघळेपर्यंत डिस्प्रिनचे पाणी ढवळत राहा. जलद विरघळण्यासाठी, तुम्ही गोळ्या पाण्यात घालण्यापूर्वी त्यांचे तुकडे करू शकता.
वॉशिंग मशीनमध्येदेखील थोड्या एस्पिरिनच्या गोळ्या घालू शकता
पुढे, फिकट पांढरे कपडे एका एस्पिरिन विरघळलेल्या पाण्याच्या भांड्यात ठेवा. कपड्यांना काही तास भिजवू द्या. तुमच्याजवळ वेळ कमी असेल तुम्ही थेट वॉशिंग मशीनमध्येदेखील थोड्या एस्पिरिनच्या गोळ्या घालू शकता. परंतु कपडे गोळ्यांच्या पाण्यात भिजवण्याची पद्धत अधिक चांगली काम करते. बऱ्यापैकी कपडे भिजवल्यानंतर, तुम्हाला ते नेहमीप्रमाणे मशीनमध्ये धुवावे लागतील. त्यानंतर नक्कीच तुम्हाला कपड्यांच्या स्वच्छतेमध्ये फरक जाणवेल.
