उन्हाळ्यात व्यायाम करताना ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
उन्हाळ्यात तंदुरुस्त राहणे महत्वाचे असते, परंतु या दिवसांमध्ये शारीरिक गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्ही उन्हाळ्यात व्यायाम करत असाल तर त्या दरम्यान आरोग्याला नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहि

उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये आपण आपल्या आहाराची काळजी घेत थंड पदार्थांचे सेवन करत असतो. ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहील. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसात फिटनेसप्रेमी त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक सतर्क होतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करतात तर काही लोक सक्रिय उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी व्यायाम करत असतात. पण उन्हाळ्यात व्यायाम करणे सोपे नसते, कारण आधीच वातावरणात उष्णतेचा पारा जास्त असतो. त्यामुळे वर्कआउट करताना खूप घाम येतो, शरीर लवकर थकते आणि डिहायड्रेशनची समस्या देखील सामान्य उद्भवते.
उन्हाळ्यात जर तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही तर तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. म्हणूनच या दिवसांमध्ये व्यायाम करताना तुमच्या शरीराच्या गरजा, हवामानातील उष्णता आणि तुमच्या हायड्रेशन पातळी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात व्यायाम करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा फिटनेस जर्नी सुरक्षित आणि प्रभावी होईल.
हायड्रेटेड रहा
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सर्वात जास्त घाम येत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याच सोबत आवश्यक खनिजेही कमी होतात, ज्यामुळे डिहायड्रेशन, थकवा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून व्यायामाच्या 30 मिनिटे आधी 1 ग्लास पाणी प्या. व्यायामादरम्यान पाणी घोट घोट करून पीत राहा. तुम्हाला हवे असल्यास, लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट पेय देखील घ्या.
योग्य वेळी वर्कआउट करा
उन्हाळ्यात कडक उन्ह आणि वातावरणात गरम हवा यांचा शरीरावर थेट परिणाम होतो, विशेषतः दुपारच्या वेळी. म्हणून योग्य वेळी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करा. जर तुम्ही बाहेर व्यायाम करत असाल तर सूर्यास्तानंतरची वेळ निवडा. खूप उष्ण किंवा दमट हवामानात व्यायाम करू नका.
हलके आणि सैल कपडे घाला
उन्हाळ्यात व्यायाम करताना घट्ट आणि सिथेंटिक कपडे घाम शेषून घेत नाही आणि शरीराला गरम ठेवते. हलके रंग आणि सैल फिटिंग कपडे वर्कआउट करताना घालावे. तसेच उन्हाळ्यात व्यायाम करताना घाम शोषून घेण्यासाठी कपड्यांचे जास्त लेअर घालणे टाळावे.
शरीराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
उन्हाळ्यात शरीरावर थकवा आणि उष्णतेचे परिणाम लवकर दिसून येतो . तुम्हाला व्यायाम करताना चक्कर येत असेल, जास्त घाम येत असेल, डोकेदुखी होत असेल किंवा मळमळ होत असेल तर ताबडतोब ब्रेक घ्या. तसेच, प्रत्येक वर्कआउट सेशन नंतर शरीराला विश्रांती द्या. वर्कआउट दरम्यान ब्रेक घ्यायला विसरू नका. जर समस्या वाढली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आहार आणि उर्जेची काळजी घ्या
उन्हाळ्यात फक्त व्यायाम पुरेसा नाही. तर योग्य आहार देखील महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात शरीराची ऊर्जा लवकर संपते, म्हणून हलके आणि पौष्टिक अन्न खाणे महत्वाचे आहे. व्यायामापूर्वी हलका नाश्ता घ्या. नंतर प्रथिनेयुक्त जेवण घ्या. तसेच उन्हाळ्यात तुमच्या आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)