AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन फ्रिज खरेदी करण्याआधी या 5 गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होईल पश्चाताप

उन्हाळ्यात उकाड्याने त्रस्त झाला असाल आणि नवीन फ्रिज घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आकारानुसारच फ्रिज घ्यायला हवा. आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते वाचा....

नवीन फ्रिज खरेदी करण्याआधी या 5 गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
Refrigerator
| Updated on: Apr 06, 2026 | 6:56 PM
Share

उन्हाचा तडाखा वाढला आहे. आता घरात फ्रिजची गरज वाढली आहे. जर तुम्हीही नवा फ्रिज खरेदी करण्याच्या विचारात आहात तर केवळ डिझाईन आणि किंमत पाहून निर्णय घेऊ नका. एक योग्य फ्रिज तुमच्या विजेच्या बिलासह जेवणाच्या क्वालिटीसह अनेक गोष्टीवर परिणाम करु शकतो. यासाठी फ्रिज खरेदी करण्याआधी काही बाबींची माहिती घेणे गरजेचे आहे.चला सविस्तरपणे माहिती घेऊयात…

योग्य कॅपेसिटीचे मॉडेल

फ्रिज खरेदी करताना सर्वात आधी आपल्या कुटुंबाच्या आकाराने त्याची कॅपेसिटी पाहून तो खरेदी करावा. जर तुमच्या घरात २ ते ३ लोक रहात असेल तर त्या हिशेबाने २०० ते ३०० लिटरचा फ्रिज पुरेसा आहे. तर मोठ्या कुटुंबासाठी ३०० लिटरहून जास्त कॅपेसिटीचे मॉडेल घेणे योग्य असेल.

स्टार रेटिंग चेक करा

फ्रिज २४ तास ऑन राहात असतो. त्यामुळे वीजचा वापर खूप जास्त होत असतो. यासाठी ४ स्टार वा ५ स्टार वाला फ्रिज खरेदी करणे जास्त योग्य असेल. यामुळे तुमचे वीजेचे बिल खूप प्रमाणात कमी होऊन जाईल.

सिंगल वा डबल डोअर

जर तुमचे बजेट थोडे कमी असेल तर तुम्हाला लिमिटेड यूजसाठी फ्रिज हवा असेल तर सिंगल डोअर फ्रिज योग्य ठरेल. तर जास्त स्टोरेज आणि चांगल्या कुलिंगसाठी डबल डोअर फ्रिज एक चांगला पर्याय आहे. आजकाल मार्केटमध्ये तर ट्रिपल डोअर आणि साईड-बाय-साईड डोअरवाल्या फ्रिजचे मॉडेल देखील बाजारात आले आहेत.

इन्वर्टर टेक्नोलॉजी –

जर तुम्ही नवीन फ्रिज घेत असाल तर इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवाला फ्रिजच विकत घ्या. हा फ्रिज केवल वीजेची बचत करत नाहीत तर आवाज देखील कमी करतात. तसेच हे फ्रिज जास्त वेळ चालतात. यामुळे हा सौदा तुमच्यासाठी जास्त फायद्याचा होऊ शकतो.

फिचर्स आणि ब्रँड

हल्ली फ्रिजमध्ये जबरदस्त फिचर्स आले आहेत. उदा.डोअर कुलिंग, स्मार्ट कनेक्टिव्हीटी आणि डीफ्रॉस्ट टेक्नॉलॉजी देखील पाहायला मिळत आहे. फ्रिज घेताना विश्वासार्ह ब्रँडचा विकत घ्या. म्हणजे सर्व्हीस आणि वॉरंटीच्या वेळीनंतर त्रास व्हायला नको.

Follow Us
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात.
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल.
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी.
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे.
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी..
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी...