AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळ पाण्यासोबतच त्यातील मलईचेही शरीराला मिळतात फायदे, जाणून घ्या त्यांच्या पौष्टिक मूल्यांबद्दल…

उन्हाळ्यात नारळाचे पाणी मोठ्या प्रमाणात प्यायले जाते. काही नारळांमध्ये म्हणजेचं शहाळ्यामध्ये मलईसुद्धा असते. तर तुम्ही नियमित प्रमाणात जर नारळपाणी पिण्यासोबतच त्यातील मलाई खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला या लेखात आपण नारळाच्या मलाईच्या पौष्टिक मुल्यांबद्दल जाणून घेऊयात.

नारळ पाण्यासोबतच त्यातील मलईचेही शरीराला मिळतात फायदे, जाणून घ्या त्यांच्या पौष्टिक मूल्यांबद्दल...
Coconut creamImage Credit source: pexels
| Edited By: | Updated on: May 09, 2026 | 8:25 AM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात नारळपाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तर अनेकजण नारळापाणी प्यायल्यानंतर त्यातील मलई आवडीने खातात. पण तुम्हाला माहित आहे का की शहाळ्यातील मलई ही खरंतर पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. ताज्या नारळाच्या आतला हा पांढरा, मऊ गर केवळ मलईदार चवीचाच नसतो, तर शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवतो. त्यात आरोग्यदायी फॅट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे ऊर्जा देण्यास पचनक्रिया सुधारण्यास आणि त्वचा व केसांच्या आरोग्यास मदत करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण नारळाच्या मलईचे पौष्टिक मूल्य आणि शरीरासाठी असलेले फायदे जाणून घेऊयात.

नारळाच्या मलईमधील पौष्टिक मूल्ये

हेल्थलाइननुसार नारळाची मलई एक पोषक तत्वांनी समृद्ध मानली जाते. त्यात आरोग्यदायी फॅट्स, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तर या मलईमधील मीडियम-चेन ट्रायग्लिसराइड्स (MCTs) त्वरित ऊर्जा देतात. त्यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे यांसारखी खनिजे देखील असतात, जी शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांना आधार देतात.

नारळाच्या मलईमध्ये अल्प प्रमाणात प्रथिने देखील असतात, जी आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर मानली जातात. त्यातील फायबर आपली पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते. त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

नारळाच्या मलईचे फायदे

झटपट ऊर्जा देण्यास मदत करते – नारळाच्या मलईमधील आरोग्यदायी फॅट्स त्वरित ऊर्जा देण्यास मदत करतात. म्हणूनच अनेक लोक ऊर्जावर्धक म्हणून त्याचे सेवन करतात.

हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकते – योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्यातील चांगले फॅट्स ऊर्जा प्रदान करू शकतात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात . तथापि त्यांचे सेवन प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

पचनक्रिया सुधारते – मलईमध्ये असलेल्या फायबरचे प्रमाण निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होण्यासही मदत होते, असे मानले जाते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते– नारळाच्या मलईत असे काही घटक आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर – यामध्ये असलेले आरोग्यदायी फॅट्स आणि पोषक तत्वे त्वचेला आर्द्रता देण्यास आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....