Amla Chutney : मसालेदार आणि आरोग्यदायी आवळ्याची चटणी घरी बनवा, जाणून घ्या रेसिपी!

| Updated on: Oct 27, 2021 | 9:29 AM

आवळा त्याच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो. आवळ्याचा उपयोग अनेक शतकांपासून रोग बरे करण्यासाठी केला जात आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.

Amla Chutney : मसालेदार आणि आरोग्यदायी आवळ्याची चटणी घरी बनवा, जाणून घ्या रेसिपी!
आवळा चटणी
Follow us on

मुंबई : आवळा त्याच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो. आवळ्याचा उपयोग अनेक शतकांपासून रोग बरे करण्यासाठी केला जात आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. तुम्ही लोणचे, मुरब्बा, कँडी, ज्यूस आणि च्यवनप्राशच्या रूपात याचे सेवन करू शकता. आवळा चटणीही बनवू शकता. चला जाणून घेऊया त्याची खास रेसिपी.

साहित्य

आवळा – 1/2 किलो

चिरलेली कोथिंबीर – 1 कप

चिरलेली हिरवी मिरची – 1 टीस्पून

आले – 1 इंच

जिरे – 1/2 टीस्पून

हिंग – 1/4 टीस्पून

काळे मीठ – 1/4 टीस्पून

चवीनुसार मीठ

साखर – 2 टीस्पून

आवळा चटणी कशी बनवायची?

स्टेप -1

सर्व प्रथम आवळे घ्या आणि मोठं-मोठे कापून घ्या.

स्टेप – 2

कोथिंबीर धुवून बारीक करून घ्या.

स्टेप – 3

हिरवी मिरची आणि आले कापून बाजूला ठेवा.

स्टेप – 4

ब्लेंडरमध्ये आवळा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जिरे, हिंग, काळे मीठ, मीठ आणि साखर घाला.

स्टेप – 5

मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून चांगली पेस्ट तयार करा.

स्टेप – 6

हवाबंद डब्यात साठवा आणि रेफ्रिजरेट करा.

आवळ्याचे आरोग्य फायदे

आवळा त्याच्या अँटी-ऑक्सिडंट, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो. आवळा पॉलिफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. जे निरोगी पचन करण्यास मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. ते शरीराचे व्हायरस आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करते. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून देखील संरक्षण करते. हे चांगले चयापचय राखण्यास मदत करते.

टॉक्सिन त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते, शरीरातील ऊर्जा पातळी कमी करते. आवळा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. आवळा खाल्ल्याने टॉक्सिनची पातळी कमी होऊ शकते आणि निरोगी हृदयासाठी व रक्तवाहिन्यासंबंधी क्रियाकलाप वाढवण्यासाठी आवळा फायदेशीर आहे. मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Amla Chutney beneficial for health)