AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : पावसाळ्यात चुकूनही मशरूम खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य!

या पावसाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण याच हंगामात पोटदुखी आणि विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.

Health Care : पावसाळ्यात चुकूनही मशरूम खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य!
पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 23, 2021 | 8:48 AM
Share

मुंबई : या पावसाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण याच हंगामात पोटदुखी आणि विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. या हंगामात बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पुर्णपणे टाळले पाहिजेत. कारण बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण आजारी पडण्याची दाट शक्यता असते. (Avoid eating mushrooms during the rainy season)

विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. कारण पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा. आपल्या सर्वांना माहीती आहे की, मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात.

ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मानवी शरीरासाठी व्हिटॅमिन D खूप आवश्यक आहे. शरीरात याची कमतरता पडल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. असं असलं तरी व्हिटॅमिन D खूप कमी भाज्यांमध्ये सापडते. यापैकी मशरूम एक आहे. मशरूम खाल्ल्यास शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. यामुळे शरीराची व्हिटॅमिन D ची गरज पूर्ण होते.

पांढऱ्या आणि पोर्टेबेला प्रकारच्या मशरूममध्ये याचं प्रमाण सर्वाधिक असते. आहार तज्ज्ञ देखील मशरूमला दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. मात्र, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला डाॅक्टर देखील देतात. मशरूम अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होतात. त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची पद्धत देखील अगदी साधीसोपी आहे. खूप कमी वेळेत मशरूमचे सलाड, भाजी किंवा सूप तयार करता येते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Avoid eating mushrooms during the rainy season)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...