Health Care : दुधासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाणे टाळा, अन्यथा होऊ शकतो पचनाचा त्रास!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 12:02 PM

दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे.

Health Care : दुधासोबत 'हे' 5 पदार्थ खाणे टाळा, अन्यथा होऊ शकतो पचनाचा त्रास!
दूध

मुंबई : दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे. दूध पिण्यामुळे अनेक रोग देखील आपल्यापासून दूर राहतात. मात्र, बऱ्याच लोकांना दुधासोबत अनेक पदार्थ खाण्याची सवय असते. पण असे काही पदार्थ आहेत, ज्याचे सेवन आपण दुधासोबत केले तर त्याचे हानीकारक परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. हे पदार्थ नेमके कोणते हे आज आपण बघणार आहोत. (Avoid eating these 5 foods with milk)

दूध आणि मासे

दोन प्रोटीनयुक्त स्त्रोतांचा आहारात एकाच वेळी समाविष्ठ न करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रोटीनचा शाकाहारी स्त्रोत आणि प्रोटीनचा मांसाहारी स्त्रोत एकाच वेळी आहारात समाविष्ट करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. दूध आणि मासे प्रोटीनने संपन्न स्त्रोत आहे. हे दोन पदार्थ एकत्र खाण्यामुळे आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात.

दूध आणि आंबट फळे

दूध आणि आंबट फळसोबत खाणे टाळले पाहिजे. आपण जर आंबट फळे आणि दूधसोबत घेतले तर आपल्या पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. यामुळे पोटदुखी अपचन होऊ शकते. कारण, आंबट फळामध्ये आम्ल असते. जे दुधाचे पचन रोखू शकते.

तेलकट पदार्थ आणि दूध

आपण सर्वजण तूप लावलेले पराठे दूध पिताना खातो. दुधासोबत तेलकट पदार्थ खाणे आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे आपली पचनशक्ती धीमी पडते. आपल्या शरीराला सतत सुस्ती येत राहते. ज्यावेळी तुम्ही एक ग्लास लस्सीसोबत छोले भटुरे खाता, त्यावेळी तुम्हाला झोप अनावर होते.

दूध आणि दही

दुधाबरोबर दही सेवन केल्याने अपचन होऊ शकते. ज्यामुळे तेथे गॅस, पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात. यामुळे आपण शक्यतो दही आणि दूधसोबत खाणे टाळले पाहिजेत.

उडीद डाळ आणि दूध

उडदाची डाळ दुधासोबत खाल्ल्यास आपल्याला दिर्घकाळ सोबतीला राहणारे विकार होऊ शकतात. या विकारात अ‍ॅसिडीटी, गॅस, सूज अशा त्रासांचा समावेश आहे. त्यामुळे दुधासोबत उडीद डाळ खाणे टाळा. उडीद डाळ आणि दूधसोबत खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Avoid eating these 5 foods with milk)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI