Health Tips : ‘या’ 4 सवयी बदला, आजार तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत!

| Updated on: Oct 29, 2021 | 10:58 AM

प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. ते प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती चांगली राहते. पोट साफ होते. आयुर्वेदामध्ये पोट हे अर्ध्याहून अधिक रोगांचे घर असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे त्याची नियमित स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.

Health Tips : या 4 सवयी बदला, आजार तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत!
आरोग्य
Follow us on

मुंबई : एक काळ असा होता की वृद्धापकाळाशी आजारांचा संबंध असायचा. मात्र, आजकाल तरुण वयात मधुमेह, थायरॉईड, बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, गुडघेदुखी आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खराब जीवनशैली आणि आहार हे याचे कारण आहे. झोपणे, उठणे, खाणे-पिणे या वाईट सवयींमुळे आपल्या एकूणच आरोग्यावर परिणाम होतो.

त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत शरीर रोगांशी लढण्यास सक्षम राहत नाही. परिणामी आपल्याला हळूहळू विविध आजारांनी घेरले जाते. बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, या समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या जीवनशैलीतील काही सवयी बदलणे. येथे जाणून घ्या अशाच 4 सवयींबद्दल जे आजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकतात.

रिकाम्या पोटी पाणी प्या

प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. ते प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती चांगली राहते. पोट साफ होते. आयुर्वेदामध्ये पोट हे अर्ध्याहून अधिक रोगांचे घर असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे त्याची नियमित स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

निरोगी नाश्ता

असे म्हणतात की माणसाने सकाळी राजाप्रमाणे नाश्ता केला पाहिजे. राजासारखा नाश्ता करणे म्हणजे नाश्त्यामध्ये इतक्या पौष्टिक आणि आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला पाहिजे की शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. अशा स्थितीत ज्यूस, दूध, अंडी, कोंब आलेली कडधान्य, उपमा, रवा इडली, पोहे आदी पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश केला पाहिजे. पराठे, पुरी वगैरे नाश्त्यामध्ये टाळा.

45 मिनिटे व्यायाम

नाश्त्यापूर्वी सुमारे 45 मिनिटे नियमितपणे व्यायाम करा. यामध्ये योगाचाही समावेश करा. योग आणि व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आजकाल कमी शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणा वाढत आहे. त्यामुळे सर्व आजार झपाट्याने घेरतात. म्हणूनच नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. याशिवाय मानसिक तंदुरुस्तीसाठी योगा आणि प्राणायाम हे खूप महत्त्वाचे आहे.

7-8 तासांची झोप अत्यंत महत्वाची

आजकाल लोक सतत मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये गुंतलेले असतात. यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो आणि झोप न मिळाल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळा येतो. या समस्या टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 7-8 तासांची झोप घेतली पाहिजे. झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल आणि लॅपटॉप स्वतःपासून दूर ठेवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Change these 4 lifestyle habits and live a healthy life)