AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये खराब जेवण मिळालं? 1 ऑक्टोबरपासून तात्काळ तक्रार नोंदवता येणार

अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच पण जेवणही खराब दिलं जातं.

हॉटेलमध्ये खराब जेवण मिळालं? 1 ऑक्टोबरपासून तात्काळ तक्रार नोंदवता येणार
फूड व्यावसायिकांसाठी हे नियम आवश्यक : अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने अन्न व्यावसायिकांना रोख पावत्या किंवा खरेदी पावत्यांवर FSSAI परवाना क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य केले आहे. जर FSSAI चा हा नियम पाळला गेला नाही तर ते अन्न व्यवसायाचे पालन न करणे आणि परवाना किंवा नोंदणी रद्द करणे सूचित करेल.
| Updated on: Jun 11, 2021 | 3:03 AM
Share

नवी दिल्ली : अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच पण जेवणही खराब दिलं जातं. मात्र, आता असं करण हॉटेल्सला महागात पडू शकतं. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी 1 ऑक्टोबरपासून एक नवा नियम लागू केलाय. यानुसार बिलमध्ये FSSAI लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केलंय. याबाबत FSSAI ने एक आदेश जारी केलाय. यामुळे आता जेवणाच्या गुणवत्तेबाबत किंवा इतर तक्रारींविषयी ग्राहकांना तक्रार करणं सोपं होणार आहे. यापुढे ग्राहक FSSAI नंबरचा उपयोग करुन संबंधित हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात (FSSAI  number compulsion to help customer in complaint registration against hotels and restaurants serving bad food).

अन्न सुरक्षा विभागाने आदेश जारी करत म्हटलं, “प्रत्येक फुड बिजनेस ऑपरेटरला आपला व्यवसाय सुरु करण्याआधी FSSAI परवाना किंवा नोंदणी मिळवणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा आहे. या व्यवसायांचा FSSAI नंबर ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियंत्रण व्यवस्था ही त्यामधील ग्राहकांच्या मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून आहे. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय नंबर नसेल तर त्यांच्या विरोधात तक्रार करणं कठिण काम होऊन जातं.”

खाद्यपदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्या नियमांच्या प्रचारासाठी निर्देश

FSSAI ने ग्राहकांच्या अधिकाराचं संरक्षण करणाऱ्या या नव्या नियमांबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्याचंही नियोजन केलंय. यासाठी त्यांनी परवाना आणि नोंदणी अधिकाऱ्यांना नव्या नियमांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम 2 ऑक्टोबर 2021 पासून लागू होतील. पॅकेजिंक केलेल्या अन्नपदार्थांवर FSSAI नंबर छापणं बंधनकारक करण्यात आलंय. यात रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकानं, केटरर्स आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. यांनाही आपल्या खाद्य पदार्थांवर हा नंबर नमूद करावा लागेल.

FSSAI नंबरचं ग्राहकांसाठी महत्त्व काय?

FSSAI नंबर हा कोणत्याही खाद्यपदार्थ उत्पादकाचा खास 14 अंकी क्रमांक असतो. FSSAI नंबर संबंधित उत्पादकाच्या खाद्यपदार्थ पॅकिंगवर नमूद असेल तर त्यांच्याविरोधात सहज तक्रार करता येते. मात्र, जर तो क्रमांक नसेल तर संबंधित पदार्थ कुणाचे आहेत याची ओळख पटवणं कठीण होतं. म्हणूनच फूड बिजनेस ऑपरेटरची तक्रार करण्यासाठी हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यातून दोषींवर तात्काळ कारवाई करता येणार आहे.

हेही वाचा :

मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण

PHOTO | राज्यात निर्बंध, लॉकडाऊनच्या भीतीने अनेक मजूर परतीच्या वाटेवर

डेकोरेटर व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ पाहा :

FSSAI  number compulsion to help customer in complaint registration against hotels and restaurants serving bad food

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.