Weight Loss : दररोज दालचिनी युक्त चहा प्या आणि वाढलेले वजन कमी करा, वाचा!

वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे.

Weight Loss : दररोज दालचिनी युक्त चहा प्या आणि वाढलेले वजन कमी करा, वाचा!
वेट लॉस

मुंबई : वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे झटपट तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. (Drink cinnamon tea daily and lose weight)

कमी वेळात वजन कमी करायचे असेल, तर दालचिनी युक्त चहाचे सेवन करण्यास सुरुवात करा. दालचिनी चहा वजन नियंत्रणासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पेय मानला जातो. या चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्मांसह चयापचय वाढवणारा गुणधर्म देखील आहे. ज्यामुळे तो एक चांगला डीटॉक्स पेय देखील बनतो. दालचिनी चहाचे सेवन केल्यास चरबी लवकर बर्न होण्यास मदत होते.

चहामध्ये दालचिनी वापरून आरोग्याची काळजी घेता येते. दालचिनी चहा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त आहे. जाणकारांच्या मते, दालचिनीमध्ये अनेक औषधी घटक असतात. यात अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मदेखील आहेत. टाईप- 2 मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टंटमध्ये दालचिनी चहा रामबाण उपाय आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दालचिनी चहा फायदेशीर आहे. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन कप दालचिनी चहा प्या. त्याचवेळी दररोज चालणे करा.

जेवणात दालचिनीचा उपयोग करणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. दालचिनी विविध अर्थाने गुणकारी आहे. त्यामुळे मसाल्यात आवर्जून दालचिनीचा वापर करायला हरकत नाही. दालचिनीचे आयुवैर्दिक गुणधर्म आहेत. त्यातील प्रमुख गुणधर्म म्हणजे दालचिनी खाण्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यास मदत होते. त्यामुळे जेवण चवदार बनवण्याच्या हेतूनेच नव्हे तर एक आयुर्वेदिक उपाय म्हणून जेवणात दालचिनीचा वापर रोज केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink cinnamon tea daily and lose weight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI