AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fenugreek Seeds Water : मेथीचे पाणी दररोज पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे!

मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात.

Fenugreek Seeds Water : मेथीचे पाणी दररोज पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे!
मेथीचे पाणी
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : मेथी जास्त करून खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. मेथी दाणे आपल्या अन्नाची चव वाढवण्याशिवाय आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे जीवनसत्त्वे आणि खनिज समृद्ध असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. मेथीचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मेथीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. (Drinking fenugreek water is beneficial for health)

मेथीचे पाणी तयार करण्याची पध्दत

एका कढईत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या. त्यानंतर आता मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मेथीची पूड घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते. हे मेथीचे खास पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिले पाहिजे. ज्यामुळे याचे जास्त फायदे आपल्या शरीराला होतील.

मेथीचे पाणी पिण्याचे फायदे

1. मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळ भरल्यासारखे वाटते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा मेथीचे हे खास पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.

2. मेथीच्या दाण्यांमध्ये केसांची वाढ करणारे पोषक घटक असतात. हे केस जाड आणि केसांचा कोंडा काढण्यास मदत करतात. हे पाणी पिल्याने आपले केस काही दिवसांमध्ये जाड आणि लांब होतील.

3. मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. हे आपल्याला पचन संबंधित समस्यांशी लढण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या इतर पाचन समस्यांना प्रतिबंधित करते.

4. मेथीचे दाणे मधुमेहासाठी एक उत्तम उपाय आहे. मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथीच्या बियामध्ये अमीनो अॅसिड असते. जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

5. मेथीचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर उपचार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

6. हे पाणी आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले आहे. मेथी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्यांना प्रतिबंधित होतो.

7. मेथीच्या बियामध्ये नैसर्गिक विद्रव्य फायबर असते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. ते हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्या हृदयाचे रक्षण करतात. मेथीचे पाणी पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drinking fenugreek water is beneficial for health)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...