दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ‘हे’ पदार्थ खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याबद्दलचा थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. विशेषतः या काळात आपण आहारात काय खातो हे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

दररोज सकाळी नाश्त्यामध्ये 'हे' पदार्थ खा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
आहार
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 3:35 PM

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आरोग्याबद्दलचा थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. विशेषतः या काळात आपण आहारात काय खातो हे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देत आहे. विशेष म्हणजे आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कमजोरी दूर होईल. (Eat these foods for breakfast every morning and boost the immune system)

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे निरोगी एलडीएल ब्लड कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत संतृप्त अन्न म्हणून शरीराचे पोषण करते.

ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्स देखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. ओट्समुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्स सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही.

सकाळच्या नाश्त्यामध्ये पालकचा रस पिणे खूप फायदेशीर आहे. पालकाचा रस आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते.

ब्रोकोली लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. यात इंडोल्ड 3 कार्बिनॉल देखील आहे, जो शरीरातील अ‍ॅक्रेल हायड्रोकार्बन रिसेप्टर नावाच्या प्रोटीनला सक्रिय करतो. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते.

व्यायामामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. या व्यतिरिक्त, हे शरीरातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते. काही काळ व्यायाम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. धावणे, पोहणे, व्यायाम करणे आणि वजन उचलणे यासारखे एरोबिक व्यायाम रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत. कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Eat these foods for breakfast every morning and boost the immune system)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.