AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multani Mitti Benefits : मुलतानी माती त्वचा आणि केसांसाठी वरदानच, वाचा अधिक!

मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम, क्वार्ट्ज, सिलिका, लोह, कॅल्शियम, कॅल्साइट सारखी खनिजे आढळतात. विशेष म्हणजे ही मुलतानी माती फक्त आपल्या त्वचेसाठीच नाही तर आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे.

Multani Mitti Benefits : मुलतानी माती त्वचा आणि केसांसाठी वरदानच, वाचा अधिक!
मुलतानी माती
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 10:05 AM
Share

मुंबई : मुलतानी मातीचा वापर अनेक वर्षांपासून कॉस्मेटिक म्हणून केला जात आहे. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम, क्वार्ट्ज, सिलिका, लोह, कॅल्शियम, कॅल्साइट सारखी खनिजे आढळतात. विशेष म्हणजे ही मुलतानी माती फक्त आपल्या त्वचेसाठीच नाही तर आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मुलतानी माती केसांना लावल्याने आपले केस सुंदर आणि मुलायम होण्यास मदत होते. (Multani soil is beneficial for skin and hair)

1. जर आपल्या डोक्यात कोंड्याची समस्या असेल तर आपण आठवड्यातून एकदा मेथीची पेस्ट, लिंबू आणि मुलतानी मातीचा हेअर पॅक केसांना लावला पाहिजे. हा पॅक साधारण अर्धा तास आपण केसांवर ठेवल्यानंतर शैम्पू आणि कंडिशनर केस धुवा. या पॅकमुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

2. कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी  मुलतानी मातीमध्ये मध आणि मेथीची पेस्ट मिक्स करा आणि टाळूपासून खालपर्यंत लावा. काही दिवसातच फरक दिसून येईल.

3. जर आपले केस कमी वयातच पांढरे होत असतील तर आपण मुलतानी मातीचा हेअर पॅक केसांना लावला पाहिजे. यामुळे आपल्या पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी एक वाटी मुलतानी माती घ्या आणि त्यामध्ये लिंबू मिक्स करून केसांना लावा.

4. मुलतानी मातीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी मुलतानी माती, अंडी आणि मध लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपला चेहरा सुंदर होईल.

5. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी मुलतानी माती एक चमचा, हळद आणि खोबरेल तेल लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.

6. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण मुलतानी मातीचा फेसपॅक वापरू शकतो. यासाठी मुलतानी, दही, हळद लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण वीस मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Multani soil is beneficial for skin and hair)

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...