AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: रात्र पाळीत काम करताना आरोग्य नीट ठेवण्यासाठी ‘हे’ करा आणि तंदुरुस्त राहा!

सध्या प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. अगोदर लोक दिवसभर आॅफिसचे काम करत होते. मात्र, आता नाईट शिफ्टमध्ये देखील आॅफिसचे काम करावे लागते

Health Tips: रात्र पाळीत काम करताना आरोग्य नीट ठेवण्यासाठी 'हे' करा आणि तंदुरुस्त राहा!
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 12:27 PM
Share

मुंबई : सध्या प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. अगोदर लोक दिवसभर आॅफिसचे काम करत होते. मात्र, आता रात्र पाळीमध्ये देखील आॅफिसचे काम करावे लागते. रात्र पाळीमध्ये काम केल्यामुळे आपली जीवनशैलीही बदलते. आपण आपल्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देऊ शकत नाही, यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Follow these tips when working night shifts)

यामुळेच बऱ्याच लोकांचे रात्र पाळी केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. बर्‍याच अभ्यासांमध्ये असा दावा केला आहे की, रात्र पाळीमध्ये काम केल्याने आरोग्याशी संबंधित आजार वाढतात. परंतु आपल्या जीवनशैलीत बदल करुन आपण आजारांना टाळू शकता. रात्र पाळीमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजेत. हे आज आपण बघणार आहोत.

भरपूर झोप घ्या

कामानंतर दिवसभर झोप घ्या. झोपेनंतर आपण ताजेतवाने व्हाल आणि आपल्याला फ्रेश झाल्यासारखे वाटेल. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी दिवसा 7 ते 8 तासांची संपूर्ण झोप घ्या.

जंक फूड खाऊ नका

बरेच लोक रात्र पाळीमध्ये काम करताना बाहेर जंक फूड खातात. पण अशी चूक करू नका. रात्री काम करताना हेल्दी अन्न खा. अशा गोष्टी खाल्ल्याने तुमचे पोटही भरले जाईल आणि सतत भूक देखील लागणार नाही.

फळे खा

रात्र पाळीमध्ये काम करण्यासाठी फळांचे सेवन करावे. यामुळे शरीरात उर्जा कायम राहते. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. हंगामी फळे खाणे आरोग्यदायी असतात. या गोष्टी आपल्याला उर्जा देतील आणि तंदुरुस्त देखील ठेवतील.

चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा

रात्री काम करण्यासाठी लोक चहा आणि कॉफीचा सहारा घेतात. पण जास्त चहा आणि कॉफी पिणे टाळावे. जास्त चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याऐवजी आपण हर्बल चहा आणि ग्रीन टी घेऊ शकता.

व्यायाम करा

रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्यामुळे बहुतेक लोक व्यायाम आणि शारीरिक हालचाली करणे टाळतात. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. जर आपण जास्त व्यायाम करू शकत नाही तर अर्धा तास चाला.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips when working night shifts)

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...