AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coriander | मधुमेह नियंत्रित करेल, हिमोग्लोबिन वाढवेल, वाचा ‘कोथिंबीर’ खाण्याचे महत्त्वपूर्ण फायदे

हिरव्यागार कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यात मदत करतात.

Coriander | मधुमेह नियंत्रित करेल, हिमोग्लोबिन वाढवेल, वाचा ‘कोथिंबीर’ खाण्याचे महत्त्वपूर्ण फायदे
कोथिंबीर
| Updated on: May 17, 2021 | 5:02 PM
Share

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या घरात ‘कोथिंबीर’ हा घटक असतोच, बहुतेक घरात अन्नपदार्थांमध्ये कोथिंबीर टाकली जाते. भाज्या असो किंवा डाळ, चटणी असो वा अन्नाची सजावट असो, कोथिंबीरच्या हिरव्यागार पानांशिवाय करताच येणार नाही. परंतु आपणास हे माहित आहे का की, कधीकधी भाज्यांबरोबरच फुकट मिळणारी कोथिंबीर शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रामबाण उपाय आहे?(Health Benefits of Coriander get relief from diabetes also beneficial for hemoglobin)

खरं तर, हिरव्यागार कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यात मदत करतात. तसेच बर्‍याच रोगांपासून आराम देतात. चला तर, अशा 5 समस्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यात कोथिंबीर एक चांगले औषध म्हणून काम करते.

वाचा कोथिंबीरचे महत्त्वपूर्ण फायदे

  1. जर आपले पोट वारंवार खराब होत असेल, तर आपण कोथिंबीर युक्त चहाचे सेवन करा. यासाठी कोथिंबीरची काही पाने धुवून पाण्यात ठेवा. यानंतर अर्धा चमचा जिरे आणि बडीशेप घाला. यानंतर, हे भांडे उकळण्यासाठी ठेवून त्यात थोडासे आले आणि पाव चमचा चहापत्ती घाला. यानंतर ही चहा गाळून घेऊन त्यात थोडा मध घालून प्या. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅस, आंबटपणा, अपचन यासारख्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, यकृत देखील चांगले कार्य करते.
  2. कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. मधुमेह रूग्णांनी नियमितपणे याचे सेवन केल्यास भरपूर आराम मिळतो. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते (Health Benefits of Coriander get relief from diabetes also beneficial for hemoglobin).
  3. कोथिंबीरीचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे, असे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. मूत्रपिंडातील दगड अर्थात मुतखड्याच्या समस्येमध्ये देखील हे चांगले काम करते. यासाठी कोथिंबीर पाण्यात उकळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या, हळूहळू मूत्रमार्गाने मूत्रमार्गातून मुतखडा बाहेर निघून जातो. परंतु यासाठी कोथिंबिरीची पाने चांगली धुऊन वापरली पाहिजेत किंवा कोथिंबीर पाण्यात उकळवून खाल्ली जाऊ शकते.
  4. हिरवी कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. चटणी आणि भाजीमध्ये घालून याचे सेवन करता येते. तसेच कोथिंबिरीची पाने पाण्यात उकळून तुम्ही पिऊ शकता.
  5. ज्यांची दृष्टी कमकुवत आहे, त्यांनी निश्चितपणे कोथिंबीरचे सेवन केले पाहिजे. हिरव्या कोथिंबीरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात आहे, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Coriander get relief from diabetes also beneficial for hemoglobin)

हेही वाचा :

Photo : रोग प्रतिकारकशक्ती वाढवायची आहे?, मग केळी आणि ओट्सची स्मूदी नक्की ट्राय करा

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.