Health Tips : उन्हाळ्याच्या दिवसात या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, शरिरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा…

| Updated on: Apr 03, 2022 | 1:30 PM

Health Tips : पाणी हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. काकडी, मशरूम, टरबूज, टोमॅटो, स्टॉबेरी या फळांचा समावेश करा आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा...

Health Tips : उन्हाळ्याच्या दिवसात या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, शरिरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा...
Diet
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : पाणी (Water) हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. उन्हाळ्या दिवसात शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित अत्यावश्यक बनतं. पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. तापमान वाढलं की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. डिहायड्रेशनदेखील (Dehydration) होतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी, साधारणपणे दररोज 8 ग्लास पाणी पिण्यासाठी सांगितलं जातं.उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी काही फळं आणि भाज्यांचा समावेश केला तर शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहाते. ती फळं (Fruits) कोणती आहे? काकडी, मशरूम, टरबूज, टोमॅटो, स्टॉबेरी या फळांचा समावेश करा आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा…

1.काकडी- उन्हाळ्यात काकडी खाल्ली जाते. त्यातील 95 टक्के फक्त पाण्याचा समावेश आहे. काकडीमध्ये पोटॅशियम असते. ते उष्माघातापासून बचाव करते. खूप कमी लोकांना माहित आहे की काकडी मेंदूचे आरोग्य देखील वाढवते. काकडीत आढळणारे फिसेटीन नावाचे दाहक-विरोधी तत्व मेंदूच्या कार्यासाठी खूप चांगले मानले जाते.

2- स्ट्रॉबेरी-  स्टॉबेरीत 91 टक्के पाणी असते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, फोलेट आणि मॅग्नेशियम आढळतात. सर्व पोषक घटक मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात.

3- टरबूज-  उन्हाळ्यात लोक टरबूज आवडीने खातात. टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते आणि ते उष्माघातापासूनही बचाव करते. ते शरीरात आर्जिनिन नावाचे अमिनो अॅसिड तयार करते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. टरबूज आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

4- टोमॅटो-  टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते.सॅलड, भाजी किंवा सँडविचमध्ये वापरले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए देखील चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांचे विकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

5- मशरूम- शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मशरूम देखील खूप फायदेशीर गोष्ट आहे. त्यात व्हिटॅमिन बी-२ आणि व्हिटॅमिन-डी सारखे पोषक घटक आढळतात. मशरूममध्ये 92 टक्के पाणी असचं.  मशरूमचे नियमित सेवन केल्याने आपला थकवा कमी होतो.

टीप- या उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या…

संबंधित बातम्या

Hair Tips : पांढऱ्या केसांवर पेरूच्या पानांचा वापर करा, काळे आणि चमकदार केस मिळवा…

Skin care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे रस अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!

सावधान…! मधुमेहामुळे डोळ्यांचे होऊ शकतात गंभीर विकार या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन