
दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. त्यात लैक्टिक ऍसिड देखील असते. हे सर्व घटक शरीरासाठी अत्यंत फायेदशीर आहेत.

दह्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. हे प्रथिने शरीराची भूक नियंत्रित करते आणि वजन वाढण्यास प्रतिबंध करते. वजन कमी करण्यासाठी दह्याचा आहारात समावेश करा.

दह्यामध्ये काही प्रकारचे प्रोबायोटिक्स असतात. जे पोटाच्या कोणत्याही समस्यांपासून संरक्षण करतात. पचनशक्ती वाढवण्यासोबतच, दही गॅसच्या समस्या किंवा जुलाब, मळमळ, बद्धकोष्ठता इत्यादी दूर करण्यास मदत करते.

विशेष म्हणजे दह्याचा आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे सध्याच्या काळामध्ये दररोज दही खा.

रक्तदाब कमी करण्यापासून ते खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास दही मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाच्या समस्या कमी होतात.