AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी बनवा शुगर फ्री केक, तोही बिना मैद्याचा, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

आपल्या प्रत्येकाच्या घरी वाढदिवसानिमित्त केक घरी आणला जातो. त्यात केक हा प्रत्येकाला खायला खूप आवडतो. पण आजकाल बहुतेकजण केकमध्ये पीठ आणि साखर असल्याने खाणे टाळतात. तर आजच्या या लेखात आपण बिना मैदा आणि साखरेचा हेल्दी केक कसा बनवायचा ते जाणून घेऊयात...

घरच्या घरी बनवा शुगर फ्री केक, तोही बिना मैद्याचा, जाणून घ्या 'ही' सोपी रेसिपी
sugar free cake
| Edited By: | Updated on: Aug 13, 2025 | 10:03 PM
Share

केक म्हटलं की लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना खायला आवडतो. आपल्या घरात वाढदिवस असला की केक आणला जातो. पण अनेकदा तुम्ही वाढदिवसाव्यतिरिक्त काही वेगळया आनंदी प्रसंगी घरी केक बनवू शकता. विशेषतः मुलांना केक खूप आवडतो, परंतु आजच्या काळात, फिटनेस आणि शरीराच्या आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी साखर आणि रिफाइंड पीठापासून तयार पदार्थ खाणे टाळतात. कारण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जात नाहीत. जर तुम्ही देखील केक प्रेमी असाल, तर तुम्ही आजच्या या लेखात बिना मैदा आणि साखरेचा केक घरी कशा पद्धतीने बनवू शकता याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप रवा, 15 ते 18 खजूर (गोडपणासाठी), एक कप दूध, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप दही, 1/4 कप तेल (जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता), बदाम, अक्रोड, काजू, मनुका, एक चमचा व्हॅनिला एसेन्स, मीठ (चिमूटभर)

केक बनवण्याची रेसिपी

सर्वप्रथम खजूरांपासून सर्व बिया वेगळ्या करा आणि नंतर त्यांना किमान अर्धा तास कोमट दुधात भिजवा. यामुळे त्याची पेस्ट बनवण्यास सोपे होते. खजूर मऊ झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवा.

केक बॅटर तयार करा

आता एका भांड्यात दही, तेल आणि व्हॅनिला एसेन्स टाका. सर्व साहित्य चांगले फेटून घ्या जेणेकरून ते गुळगुळीत क्रीमसारखे होईल. आता त्यात खजूर पेस्ट टाका. जर तुम्हाला गोडवा वाढवायचा असेल तर तुम्ही शुद्ध मध किंवा चांगल्या दर्जाचा गूळ टाकू शकता.

आता एका मोठ्या खोल भांड्यात बेकिंग पावडर आणि सोडा, मीठ आणि रवा चाळून घ्या. नंतर हे मिश्रण चमच्याने मिक्स करा . आता त्यात तयार केलेले दही आणि तेलाचे मिश्रण टाका आणि केकचा बॅटर बनवून घ्या. पण हे मिश्रण जास्त फेटू नका. झाकण ठेवून कमीत कमी 20 मिनिटे बाजूला ठेवा.

केक बेक करणे

20 मिनिटांनी केकचे बॅटर तपासा, जर ते थोडे कोरडे दिसत असेल तर दोन ते तीन चमचे दूध त्यात मिक्स करा. आता यात सर्व सुकेमेवा टाका. आता ओव्हन 180 अंश सेल्सिअसवर गरम करा आणि नंतर केक मोल्डमध्ये बटर पसरवा आणि त्यात बॅटर टाका. आता त्यावर उरलेले सुकामेवा टाका. आता किमान 30 ते 35 मिनिटे बेक करा. टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने केक चिकटत नसेल तर ते तयार आहे. थंड झाल्यावर, शुगर फ्रि केक सर्वांना सर्व्ह करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.