AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरातील पळी, चमचे काळे पडलेत का? ‘या’ टिप्स वापरा, कटलरी पुन्हा चमकेल

How To Clean Cutlery: सततच्या वापराने कटलरी म्हणजेच काटे आणि नॉर्मल चमचे यांची चमक दूर होते. ते घाणेरडे दिसू लागतात. जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवलेले चमचे जुने दिसू लागले असतील तर ही ट्रिक ट्राय करा. 5 मिनिटात चमचे चमकदार आणि नवीन होतील.

स्वयंपाकघरातील पळी, चमचे काळे पडलेत का? ‘या’ टिप्स वापरा, कटलरी पुन्हा चमकेल
CutleryImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 12:39 PM
Share

How To Clean Cutlery: तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवलेले चमचे जुने दिसू लागले आहे का? मग चिंता करू नका. आपण घरातले भांडे वापरले की ते काळे दिसणारच. पण, यासाठी काय उपाय करता येईल, याचा विचार व्हायला हवा. कारण, आपण योग्य उपाय केल्यास ते पुन्हा चमकतील. आम्ही याविषयीची ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत, जाणून घेऊया.

तुमच्या घरात स्टीलचे काटे आणि साधे चमचे, काटे चमचे भरपूर असतील. नव्यामध्ये ते अतिशय चमकदार येतात, पण त्यांचा वापर सुरू करताच ते जुने दिसू लागतात आणि त्यांची चमक नाहीशी होते. तुमच्या कटलरीच्या बाबतीतही असेच घडले आहे का? आपण ते विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला ते काळे पडले की काय करावं सुचत नाही. आम्ही तुमच्यासाठी ही अतिशय सोपी ट्रिक घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कटलरीत पुन्हा चमक आणू शकाल.

कटलरी कशी स्वच्छ करावी?

मास्टर शेफ भदोरिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रेसिपी शेअर केली आहे, ज्यामध्ये ते चमचे साफ करण्याचा सोपा मार्ग सांगत आहेत. पाण्याने धुतल्यानंतरही तुमची कटलरी आणि साबण स्वच्छ होत नसेल तर तुम्ही हा हॅक करून पाहू शकता.

एका भांड्यात थोडे पाणी घालून उकळावे. एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा मीठ, अॅल्युमिनियम फॉईलचे दोन तुकडे चिरून पाण्यात टाका. आता त्यात आपले सर्व काटे आणि चमचे घालून गॅस कमी करून 10-12 मिनिटे उकळू द्या.

आता एका भांड्यात किंवा जगात स्वच्छ पाणी घालून त्यात सर्व चमचे घालावेत. एक-एक करून सर्व चमचे ब्रशने स्क्रब करा. आता स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि नंतर टिश्यू पेपरने पुसून घ्या. तुमची कटलरी किती चमकदार आहे हे तुम्हाला दिसेल. ते एकदम नवीन दिसतात. या सोप्या कटलरी क्लीनिंग हॅकचा प्रयत्न करा.

घरातल्या वस्तू स्वच्छ करता येतात. त्यात काहीही अवघड नाही. फक्त आपण त्यावर काय उपाय करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. कारण, तुम्ही टेन्शन घेत राहिलं तर तुमचं काम होणारच नाही. शिवाय वस्तूही स्वच्छ होणार नाही. आज आम्ही तुम्हाला वर दिलेली माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकते. फक्त काहीही करताना काळजीपूर्वक करा म्हणजे नुकसान होणार नाही.

Follow Us
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...