AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foods For Stamina : शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांनी दिवसाची सुरुवात करा आणि निरोगी राहा!

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे. आपण दिवसाची सुरुवात काही आरोग्यदायी पदार्थांनी (Food) करू शकतो. ते आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. स्टॅमिना  (Stamina) वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा (Foods For Stamina) समावेश करावा.

Foods For Stamina : शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी 'या' पदार्थांनी दिवसाची सुरुवात करा आणि निरोगी राहा!
या खास पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 8:27 AM
Share

मुंबई : शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे. आपण दिवसाची सुरुवात काही आरोग्यदायी पदार्थांनी (Food) करू शकतो. ते आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. स्टॅमिना  (Stamina) वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा (Foods For Stamina) समावेश करावा, असा प्रश्न अनेकवेळा मनात निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला काही काही आरोग्यदायी पदार्थांविषयी सांगणार आहोत. विशेष म्हणजे हे पदार्थ अगदी सहजपणे आपल्याला बाजारामध्ये मिळतात देखील.

केळी

नाश्त्यात केळी खाऊ शकता. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जावान ठेवतात. यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करते.

सफरचंद

रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरांपासून दूर राहू शकता. खरं तर हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स नावाचे फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या शरीरात अधिक ऊर्जा राहते.

बदाम

बदामामध्ये भरपूर पोषक असतात. ते केवळ चयापचय गतिमान करत नाहीत तर ते तुमची सहनशक्ती देखील सुधारतात. बदाम हे निरोगी फॅट्सचे पॉवरहाऊस आहेत. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये बदामाचा नक्कीच समावेश करा.

दलिया

दलिया हे सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. ज्याने तुम्ही तुमचा दिवस सुरू करू शकता. दलियामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. तुम्ही ते प्री-वर्कआउट फूड म्हणूनही घेऊ शकता. ते आणखी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्यात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या देखील मिक्स करू शकता.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळ आहे. यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन सी आणि फोलेटसारखे पोषक घटक असतात. स्ट्रॉबेरीमध्ये फिनॉल देखील असतात, जे आवश्यक अँटिऑक्सिडंट असतात. ते शरीरातील ऊर्जा पातळी वाढवतात. या फळाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात सहज करू शकता.

संबंधित बातम्या : 

चमकदार त्वचा हवीय, संत्री ते टोमॅटो ही फळं आहारात नक्की असूद्या

Honey Facial : काळवंडलेल्या त्वचेला डाग रहित करण्यासाठी आजच करा हनी फेशिअलचा वापर, त्वचा घरच्या घरी उजळून जाईल!!

Follow Us
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?