रोगप्रतिकारशक्तीपासून ते मुळव्याधावर रामबाण उपाय म्हणजे जांभूळ, वाचा याचे अनेक फायदे

उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात मिळणारे जांभूळ आपल्या आरोग्याासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:48 AM, 8 Apr 2021
रोगप्रतिकारशक्तीपासून ते मुळव्याधावर रामबाण उपाय म्हणजे जांभूळ, वाचा याचे अनेक फायदे

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात मिळणारे जांभळ आपल्या आरोग्याासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. जांभूळ खाण्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. (Java Plum is beneficial for boosting the immune system)

-रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जांभळे खूप फायदेशीर आहेत. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांनी दिवसातून दोन वेळा जांबळे खाल्ली पाहिजेत.

-जांभळात फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट इंझाएम सुरक्षित ठेवतात.

-जर आपल्याला मुळव्याधाचा त्रास असेल तर दररोज जांभळे खा. काही दिवसांमध्येच तुमचा मुळव्याधाचा त्रास गायब होईल.

-पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं.
जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते.

-अनेक लोकांना फळे रिकाम्या पोटी खाण्याची सवय असते. मात्र, असे करणे धोकादायक आहे जांभळे तर चूकुनही रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

– जर आपल्याला गॅस्ट्रिक समस्येमुळे त्रास होत असेल तर, जांभळाच्या बिया वापरल्यास या समस्येपासून आराम मिळू शकेल. पावडर किंवा जांभळाच्या बियांचा अर्क प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते.

-तुमच्या दात आणि हिरड्या कमकुवत झाल्या असतील तर जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

-मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यटिपिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते. मुलतानी माती, चंदन पावडर व जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावरती नियमित लावल्यास मुरमे नाहीसे होतात व चेहरा उजळतो, काळपटपणा दूर होतो म्हणून सौंदर्यप्रसाधनांच्या दृष्टीनेसुद्धा जांभळाचे महत्त्व आहे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Java Plum is beneficial for boosting the immune system)