Oats Dhokla Recipe : नाश्त्यासाठी स्वादिष्ट ओट्स ढोकळा बनवा, पाहा खास रेसिपी!

| Updated on: Oct 06, 2021 | 4:20 PM

ढोकळा हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ म्हणून ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला वेगळा आणि खास ढोकळा रेसिपी सांगणार आहोत. हा ढोकळा ओट्स, बेसन, आले आणि दही आणि मीठ यांच्या मिश्रणाने बनवला जातो. हा ढोकळा आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

Oats Dhokla Recipe : नाश्त्यासाठी स्वादिष्ट ओट्स ढोकळा बनवा, पाहा खास रेसिपी!
ढोकळा
Follow us on

मुंबई : ढोकळा हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ म्हणून ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला वेगळा आणि खास ढोकळा रेसिपी सांगणार आहोत. हा ढोकळा ओट्स, बेसन, आले आणि दही आणि मीठ यांच्या मिश्रणाने बनवला जातो. हा ढोकळा आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आपण संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये हा ढोकळा समाविष्ट करू शकता.

ओट्स ढोकळ्याचे साहित्य

-ओट्स – 25 ग्रॅम

-दही – 75 ग्रॅम

-आवश्यकतेनुसार मीठ

-बेकिंग पावडर – 1/2 टीस्पून

-मोहरी – 1 टीस्पून

-बेसन – 25 ग्रॅम

-आले – 2 1/2 ग्रॅम

-तेल – 1 1/2 मिली

-1 हिरवी मिरची

स्टेप – 1 ही रेसिपी बनवण्यासाठी ओट्स पावडर, मीठ, दही आणि बेसन एकत्र करून पिठ बनवा. हे मिक्स करा आणि एक तास बाजूला ठेवा. परत आले आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा.

स्टेप – 2 आता एका प्लेटला ग्रीस करा आणि त्यात ढोकळा पिठ घाला आणि सेट होईपर्यंत स्टीमरमध्ये वाफवा.

स्टेप – 3 तडका तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा. यानंतर मोहरी, चिरलेली हिरवी मिरची आणि दोन चमचे पाणी घाला.

स्टेप – 4 ढोकळ्यावर तयार तडका घाला आणि त्याचे चौकोनी तुकडे करून सर्व्ह करा.

ओट्सचे आरोग्य फायदे

ओट्स कार्बोहायड्रेट आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. त्यात प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यात फायबर आणि बीटा ग्लुकोन असते. ओट्स रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ओट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.

यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात मॅग्नेशियम आढळते. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. कारण त्यामुळे सेरोटोनिन हार्मोन बाहेर पडतो. रात्री तुम्ही याचे सेवन करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओट्सचा समावेश करू शकता. वजन कमी करण्यासाठी, साखर आणि कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित असावे. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ओट्सचा वापर करा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Make healthy and delicious oats dhokla for breakfast)