उन्हाळ्यात अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने बनवा फणसाचे लोणचे
उन्हाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात आंब्याचे लोणचे बनवतात, पण याच हंगामात उपलब्ध असलेले फणसाचे लोणचेही बनवले जाते. ते चवीला स्वादिष्ट लागते आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही. या लेखात फणसाच्या लोणच्याची रेसिपी जाणून घेऊयात.

उन्हाळा सुरू झाला की आंबा, फणस व इतर हंगामी फळ बाजारात येऊ लागतात. त्यातच उन्हाळा सुरू झाला की अनेक घरांमध्ये लोणचं बनवायला सुरूवात होते. आपल्यापैकी अनेकांकडे कच्चा कैरीपासून लोणचं बनवले जाते. पण उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या फणसापासून देखील लोणचं बनवलं जाते. फणसाचे लोणचं देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण फणस हा पोषक तत्वांनीही समृद्ध असतो, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी पासून पोटॅशियम, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, प्रथिने आणि फायबरपर्यंत सर्व काही असते.
एवढेच नाहीतर कच्चा फणसापासून भाजी देखील बनवली जाते जी चवीला अप्रतिम लागते. तर या फणसापासून लोणचे तुम्हाला अनेक दिवस हवाबंद डब्यात ठेवता येते आणि तुम्ही पराठ्यांपासून ते भात आणि रोटीपर्यंत कोणत्याही पदार्थासोबत त्याचा आनंद घेऊ शकता. चला फणसाच्या लोणच्याची सविस्तर रेसिपी जाणून घेऊयात.
जेवणासोबत लोणच्याचे सेवन एकूणच जेवणाची चव वाढवते.या उन्हाळ्यात आंब्याच्या लोणच्याऐवजी फणसाचे लोणचे बनवून बघा. तुमच्या घरातील सर्वांना हे लोणचे नक्कीच आवडेल. लोणच्याच्या रेसिपी सोबतच या लेखात काही अतिरिक्त टिप्ससुद्धा दिल्या आहेत, ज्या तुमचे लोणचे जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करतील.
फणसाचे लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
अर्धा किलो फणसाचे लोणचं बनवण्यासाठ लागणारे साहित्य सांगत आहोत. तुम्हाला जास्त लोणचे बनवायचे असल्यास, त्यानुसार मसाले वाढवा. यासाठी लागणारे साहित्य: 1 कप मोहरीचे तेल, 3 चमचे पिवळी मोहरी, 1 चमचा सुंठ पूड, 1/5 चमचा मीठ, 2 चमचे बडीशेप पूड, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे जिरे, 1 चमचा काळे मीठ, 2 चमचे मेथीचे दाणे, 1 चमचा ओवा, 1/4 चमचा हिंग आणि 1 चमचा काळी मिरी.
फणसाचे लोणचे कसे बनवायचे?
- फणसाचे लोणचे बनवण्यासाठी कच्चा फणस वापरावा लागतो. फणसाची भाजी बनवताना जसा तो आतून पूर्णपणे पांढरा असतो, तसाच तो आतूनही पांढरा असावा. सर्वप्रथम फणस धुवून कोरडा करा. हातांना थोडे तेल लावून त्याची साल काढा. त्याचे सुमारे १ ते 1.5 इंच लांबीचे लहान तुकडे करा.
- लोणचे बनवण्यासाठी फणस अर्धा कच्चा अशा प्रकारे शिजवला जातो. यासाठी एका मोठ्या भांड्यात 1 ग्लास इतक पाणी घ्या. त्यात एक स्टँड ठेवा आणि त्यावर कापलेल्या फणसाचे भांड ठेवा. आता गॅस पेटवल्यानंतर फणसावर झाकण ठेवून काही मिनिटे वाफ येऊ द्या. अधूनमधून तपासा. फणस थोडा नरम झाल्यास गॅस बंद करा.
- आता एका कढईत मोहरीचे तेल घालून त्यातून धूर येईपर्यंत तापवून घ्या आणि नंतर गॅसची आच कमी करा.
- मोहरीच्या तेलात हिंग आणि हळद टाका. नंतर वाफवलेले फणसाचे तुकडे त्यात चांगले मिक्स करा. 2 मिनिटे सतत ढवळत राहा, त्यानंतर गॅस बंद करा.
- आता तुम्हाला उरलेले मसाले एक एक करून त्यात अॅड करावे लागतील, जसे की बडीशेप पूड, आले पूड, काळे मीठ, लाल तिखट आणि इतर सर्व दळलेले व अख्खे मसाले.
- अशा प्रकारे तुमचे फणसाचे लोणचे झटपट तयार होते आणि ते खायलाही स्वादिष्ट लागते. थोडी आंबट चव हवी असल्यास त्यात आमचूर पावडर टाका.
या गोष्टी लक्षात ठेवा
- फणसाचे लोणचे लगेच खाल्ले जाऊ शकते, पण 3 ते 4 दिवसांनी खाणे अधिक चांगले असते, कारण त्यामुळे सर्व मसाले त्यात चांगले एकजीव होतात. ज्यामुळे लोणचं खायला खूप चविष्ट लागतो.
- लोणचे तयार झाल्यावर ते मोहरीच्या तेलात पूर्णपणे भिजवून ठेवा.
- यामुळे ते जास्त काळ टिकेल आणि अनेक महिने मुरून राहील.
तुमची इच्छा असल्यास फणस शिजवल्यानंतर दोन ते तीन तास उन्हात वाळवा आणि मग त्याचे लोणचे बनवा. यामुळे ते अधिक काळ टिकेल. - हे लक्षात ठेवा की ज्या भांड्यात तुम्ही लोणचे ठेवत आहात ते पूर्णपणे कोरडे असावे आणि दमट जागेत ते ठेऊ नये.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)