AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : ‘या’ गोष्टी काटेकोरपणे पाळा आणि झटपट लठ्ठपणा कमी करा!

आपल्याकडे बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. आपल्याला कदाचित माहिती असेल की, जास्त कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्याने चरबी वाढते.

Weight Loss : 'या' गोष्टी काटेकोरपणे पाळा आणि झटपट लठ्ठपणा कमी करा!
वाढलेले वजन
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 1:02 PM
Share

मुंबई : आपल्याकडे बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. आपल्याला कदाचित माहिती असेल की, जास्त कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्याने चरबी वाढते. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आहारात आणि आपल्या काही सवयींमध्ये बदल करावा लागेल. ज्यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.( Strictly follow these things and lose weight)

झोपण्याच्या दोन तास अगोदर जेवण करा

रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सौम्य, पचन करणे सोपे आणि कमी कॅलरी युक्त असावे. रात्रीच्या जेवणातील जड पदार्थ आपल्याला बर्‍याचदा अस्वस्थ करतात आणि आपल्या झोपेत अडथळा आणू शकतात. यामुळे जठरासंबंधी समस्या देखील वाढवू शकतात. विशेष म्हणजे रात्रीचे जेवण आपण लवकर केले पाहिजे. यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि लठ्ठपणा देखील वाढत नाही. रात्री झोपण्याच्या दोन तास अगोदर आपण जेवन केले पाहिजेत.

जेवणाच्या अगोदर पाणी प्या

पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते. पण, ज्यालोकांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी जेवनाच्या अगोदर शक्य आहे. तेवढे जास्त पाणी पिले पाहिजेत. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते.

चहा टाळा आणि कोमट पाणी प्या

खरोखरच आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण चहा पिणे पूर्णपणे टाळले पाहिजेत. चहाऐवजी आपण कोमट पाणी पिले तरी वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते. दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल. दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी गरम पाणी फायदेशीर आहे.

पौष्टिक आणि कमी कॅलरी

आपल्या आहारात बेरी, द्राक्षे, सफरचंद, खरबूज, ब्रोकोली, फुलकोबी, सोयाबीन, गाजर, बीट्स इ. समाविष्ट करा. या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या पौष्टिक असतात आणि त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण देखील कमी असते. हे आपल्याला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. गहू, सोया, बाजरी, ज्वारी, नाचणी, मुग, आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Strictly follow these things and lose weight)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?