AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीची झोप उडते, टीबी होतो, प्रमाणाबाहेर हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आणखी कोणते आजार होतात…

हिरवी मिरची आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी तिचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. अतिसेवनामुळे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, तोंडातील जळजळ आणि त्वचेची लालसरता निर्माण होऊ शकते. तसेच, कॅप्सेसिनमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गाचा धोका वाढतो. हृदयरोग, किडनी स्टोन, वजन वाढ आणि रक्ताची कमतरता हीही दुष्परिणामे असू शकतात. म्हणूनच हिरवी मिरची मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

रात्रीची झोप उडते, टीबी होतो, प्रमाणाबाहेर हिरव्या मिरच्या खाल्ल्याने आणखी कोणते आजार होतात...
Green Chili Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 7:34 PM
Share

आपल्या रोजच्या जेवणात अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो. अनेकदा जेवणात चमचमीत तसेच झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. जेवणाची चव वाढावी याकरिता त्यात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर आपण करतो. तिखटपणा, रंग आणि चव यासाठी जवळजवळ प्रत्येक पाककृतीमध्ये मसाल्यांचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या मिरचीचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन करत असाल तर त्याचे घातक परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.

हिरवी मिरची सामान्यत: सुक्या लाल मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. परंतु जर तुम्ही चवीच्या हव्यासापोटी हिरव्या मिरच्यांचे प्रमाणापेक्षा सेवन केलं तर तुम्हाला विविध विकार होऊ शकतात.

हिरव्या मिरच्या जास्त खाण्याचे दुष्परिणाम काय?

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, जळजळ यांसारखे समस्या उद्भवू शकतात.

दररोजच्या आहारात जर तुम्ही जास्त हिरवी मिरचीचे सेवन केल्यास तोंडातील आतील त्वचा लालसर पडते. तसेच बारीक पुरळ सुद्धा येऊन खूप वेदना होतात.

हिरव्या मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे बॅक्टेरियाविरूद्ध आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते. त्यामुळे तुमच्या शरीराला संसर्ग होण्याचा धोका संभवतो.

हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने असह्य टीबी रोग होऊ शकतो.

हिरवी मिरची खाल्ल्याने रात्रीच्या झोपेवर देखील परिणाम होतो. कारण ते आपल्या शरीरातील पेशींना उत्तेजित करते ज्यामुळे लवकर झोप येत नाही.

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढून त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो.

हिरवी मिरचीचे जास्त सेवन केल्याने वजन नियंत्रित करणे कठीण होऊ शकते.

जर तुम्ही हिरव्या मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भासू लागते.

रोजच्या आहारात अधिक प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली तर शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे बहुतेक लोकांना वेदना, सूज आणि इतर समस्या निर्माण होतात.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन