AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | वजन कमी करायचंय? मग, लिंबू पाणी नक्की प्या! जाणून घ्या या बद्दल अधिक…

आपल्यापैकी बरेच जण हे ऐकून मोठे झाले असतील की, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मधा मिसळून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. बरेच तज्ज्ञ शिफारस करतात की, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबाच्या पाण्याने करावी.

Weight Loss | वजन कमी करायचंय? मग, लिंबू पाणी नक्की प्या! जाणून घ्या या बद्दल अधिक...
लिंबू पाणी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 25, 2021 | 10:04 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी बरेच जण हे ऐकून मोठे झाले असतील की, एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मधा मिसळून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. बरेच तज्ज्ञ शिफारस करतात की, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबाच्या पाण्याने करावी. पण खरंच ते पिण्यापासून काही फायदा होतो का? आणि वजन कमी करण्यासाठी ते पिण्याची शिफारस देखील अनेक तज्ञांनी का केली आहे?

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, लिंबू पाचन तंत्रामध्ये सुधार करते. क्लीन्झरप्रमाणे शरीरास डिटॉक्सिफाय करते आणि लिंबू व्हिटामिन सीचा मुख्य स्रोत आहे. पण, हे वजन कमी करण्यास कशी मदत करते? चला जाणून घेऊया.

लिंबू पाणी का प्यावे?

तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. तर पाण्यात मिसळेले लिंबू केवळ त्याची चवच वाढवत नाही, तर पोटात साठलेली चरबी देखील कमी करते. लिंबूमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी-6, पेक्टिन आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल असते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स,केवळ  फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देत नाही तर, हृदय निरोगी ठेवतात आणि इतर प्रकारच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करतात.

वजन कमी करण्यात फायदेशीर का आहे?

लिंबूपाण्यात अनेक पोषक घटक असतात. पण, ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात पेक्टिन आहे, जे भूक नियंत्रित करण्यात मदत करते आणि जंक फूडची लालसा कमी करते. त्यामध्ये उपस्थित फ्लेव्होनॉइड्स चयापचयला चालना देतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे शरीराची जळजळ कमी होऊ शकते आणि पाण्याचे प्रमाण संतुलित करून विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करते. लिंबामध्ये पोटॅशियम असते, जे वजन कमी करून रक्तदाब नियंत्रित करते आणि शरीराला हायड्रेट ठेवते.

लिंबूपाणी कसे बनवायचे?

अधिक फायदे मिळविण्यासाठी दररोज सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते. यासाठी आधी थोडेसे पाणी गरम करावे आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा. तर, वजन कमी करण्यासाठी, एक चमचा जिरे पावडर, लिंबाचे काही तुकडे घाला आणि पाणी चांगले उकळा नंतर ते गाळून घ्या. यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला आणि प्या.

(टीप : कोणत्याही उपायापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Want to lose weight then definitely drink lemon water)

हेही वाचा :

सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?